36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeनांदेडदुचाकी चोरांची टोळी गजाआड ; ३३ दुचाकी जप्त

दुचाकी चोरांची टोळी गजाआड ; ३३ दुचाकी जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरी करणा-या चोरट्यांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.यातील तीन चोरट्यांकडून १४ लाख ८५ हजाराच्या ३३ दुचाकी जप्त केल्या आहेत.अशी माहिती पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी गुरुवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शहरासह जिल्हयात मागील काही दिवसापासून दुचाकी चोरीच्या वाढलेल्या घटना वाढत आहेत. नांदेड शहरात व परिसरातून गर्दीच्या ठिकाणी, आठवडी बाजार, मॉल्स, चित्रपटगृह, बाजारपेठेतील दुचाकी लंपास करणारी टोळी सक्रीय झाली आहे. शहरात चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.यामुळे दुचाकी चोरांना पकडण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या होत्या., असे पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी सांगीतले.यानूसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती, फौजदार अशिष बोराटे, प्रवीण राठोड यांच्या पथकाने दि.२ मार्च रोजी नांदेड शहरातून दुचाकीं चोरणा-या टोळीतील मुख्य आरोपी सरवर शेरखान पठाण रा. चिखली ता. कंधार गजाआड केले.

शेरखान पठाण याची कसुन चौकशी केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांचे नाव सांगितले. त्यात चिखली तालुका कंधार येथील मीरसाब उर्फ चाऊस अब्दुल शेख (वय २४) आणि गोविंद दिगांबर कदम (वय २०) यांनाही ताब्यात घेतले. या तिघांकडून चोरलेल्या अगोदर तीन दुचाकी जप्त केल्या. पोलिसी हिसका दिसताच या तिघांनी वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या जवळपास ३३ दुचाकी पोलिसांच्या स्वाधीन केल्या. चिखली गावातून पोलिसांनी पंचवीस दुचाकी, मारतळा येथून एक, अहमदपूर येथून तीन, कलंबर येथून एक, नांदेड शहरातून दोन, नरसी येथून एक अशा ३३ दुचाकी जप्त केल्या आहेत. या दुचाकींची किंमत जवळपास १४ लाख ८५ हजार रुपये असल्याचे शेवाळे यांनी सांगितले. या जप्त करण्यात आलेल्या दुचाकी अर्धापूर, भोकर, वजिराबाद व अहमदपूर येथील पोलिस ठाण्यास देण्यात येणार आहेत.

अटक करण्यात आलेल्या या चोरट्यांकडून आणखी गुन्हे उघड होण्याचे आणि चोरीस गेलेल्या दुचाकी सापडण्याची शक्यता आहे. तर यापुर्वी पोलिसांनी २०२० मध्ये नायगाव, नांदेड ग्रामीण व रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ६२ दुचाकी जप्त करुन २२ आरोपींना अटक केले होते. तर नांदेड ग्रामीण व इतवारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास १00 दुचाकींचे सुटे भाग जप्त करुन ६ आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या होते असे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी सांगितले.या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक मुख्यालय डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर आणि जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी लष्करे यांची उपस्थिती होती.

मुख्य प्रवेशद्वारात पोलिसांची अरेरावी पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी दुचाकी चोरट्यांची टोळी पकडल्याची माहिती देण्यासाठी पत्रकारांना पोलिस अधीक्षक कार्यालयात निमंत्रीत केले होते मात्र मुख्य प्रवेशद्वारातून जातांना येथील पोलिस कर्मचा-यांकडून पत्रकारांना अरेरावीचा सामना करावा लागला.

लातूर मनपाची २२ कोटी ३१ लाखांची वसुली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या