22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeनांदेडनांदेडमध्ये गँगवार; सराईत गुन्हेगार ठार

नांदेडमध्ये गँगवार; सराईत गुन्हेगार ठार

एकमत ऑनलाईन

नांदेड : लॉकडाउनच्या काळात शांत असलेल्या नांदेडमध्ये आता गुन्हेगारांनी डोके वर काढले आहे. शहरातील विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गाडेगाव रोडवर रविवारी रात्री ९ च्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. मात्र, रात्री उशिरापर्यंत गोळीबाराची चर्चा सुरू राहिली. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास याचे गूढ उकलले आणि गँगवॉरमधून झालेल्या गोळीबारात सराईत गुन्हेगार विक्की चव्हाणचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. दरम्यान, पोलिसांनी तपासाचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली.

विक्की आणि त्याचा मित्र अभिषेक मुन्नाजी मेहरे रविवार रात्री दुचाकीवरून घरी जात होते. त्यावेळी आरोपी अर्पित नरेंद्र निंबोरकर आणि त्याचा मित्र अभिषेक उर्फ सनी राजेश वराडपांडे यांनी दोघांचा रस्ता अडवला. अर्पितने रस्ता अडवल्यामुळे विक्की संतापला आणि दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे या वादातून अर्पित आणि त्याच्या मित्राने विक्कीवर चाकूने हल्ला केला आणि गोळीबार केला. यात विक्कीचा मृत्यू झाला.

पुरावा नष्ट करण्याच्या हेतून विक्कीला जखमी अवस्थेत आपल्या गाडीत टाकून फरार झाले होते. पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर विक्कीचा मृतदेह हा हसापूर भागात नदीवरील पुलाखाली फेकून देण्यात आला होता. घटनास्थळी पादत्राणे व रक्त सांडल्याचे दिसून आले. मात्र, गोळीबार कुणी केला, हे समजू शकले नाही. पोलिसांनी रात्रभर शहरातील प्रत्येक भागात नाकेबंदी केली होती. त्यानंतर सोमवारी सकाळी हसापूर भागात नदीवरील पुलाखाली जखमी झालेल्या विक्की चव्हाण याचा मृतदेह आढळून आला.

वर्चस्व वादातून टोळीयुद्ध
दरम्यान, काही दिवसांपूर्वी कौठा भागात विक्की चव्हाण याच्या टोळीने दुस-या गटावर तलवारीने हल्ला केला होता. विक्की हा काही महिन्यांपूर्वीच जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर विक्की पुन्हा गुन्हेगारीकडे वळला. काही दिवसांपूर्वी विक्की आरोपींच्या घरी धारधार शस्त्र घेऊन धमकी देण्यासाठी गेला होता. विक्कीचा वाडी क्षेत्रात दबदबा होता. त्यामुळे तो तडीपार गुंड होता. या भागात वर्चस्व सिद्ध करण्याच्या वादातून विक्की चव्हाण आणि आरोपी अर्पितमध्ये वाद झाला होता. त्यातूनच त्याचा खून झाला. पोलिसांनी मुख्य आरोपी अर्पित नरेंद्र निंबोरकर आणि अभिषेक वराडपांडेला अटक केली.

Read More  नोव्हेंबरमध्ये मिळू शकते स्वदेशी कोविशिल्ड लस !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या