29.7 C
Latur
Monday, January 25, 2021
Home नांदेड कचरा डेपोला आग ; ५० लाखाचे नुकसान

कचरा डेपोला आग ; ५० लाखाचे नुकसान

एकमत ऑनलाईन

लोहा : लोहा नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी असल्या मुळे कामाची मयार्दा उघड झाली आहे.महिन्याकाठी अठरा लाख रुपयांचा खर्च घन कचरा व्यवस्थापनावर होतो त्याच कचरा डेपोला सोमवारी दुपार नंतर आग लागली ती आग विझविण्यास पालिका कर्मचाऱ्यांनी तीन तास अथक परिश्रम घेतले व आग आटोक्यात आणली. संबधित अभियंता अनभिज्ञ होते .मुख्याधिकारी तर फिरकलेच नाहीत.

शहरातील कचरा डेपो हळदव शिवारात क्रीडा कार्यालयाच्या बाजूला आहे.घन कचरा व्यवस्थापनासाठी महिन्याला नगर पालिका जवळपास १८ लक्ष रुपये खर्च करते.शहरात गोळा होणाऱ्या कचऱ्याचे वजन करणे आणि त्याचे ओला व सुका करणे क्रमप्राप्त आहे शिवाय त्यावर प्रक्रिया अनिवार्य आहे .ज्या कंपनीला हे कंत्राट देण्यात आले त्यातील अटी व नियमांचे पालन करणे त्यासाठी गरजेचे यावर देखरेख नगर अभियंता व एक कर्मचारी आहेत परंतु नियमानुसार काहीच होत नाही. ज्या ठिकाणी कचरा डेपो आहे तेथे शहरातील कचरा संकलन केले जात नाही रस्त्याच्या कडेला कुठेही कचरा टाकला जातो आठ महिन्यात किती खत निर्मिती झाली याची माहिती अद्यापही सार्वजनिक करण्यात आली नाही.

घनकचरा व्यवस्थापन साठी जवळपास ५० लक्ष रुपये खर्च करून सुविधा करण्यात आल्या आहेत संबधित कंत्राटदार यांचे कामगार कचरा विलगीकरणा साठी असायला हवे पण तसे नसते याचा अनुभव प्रत्यक्ष पालिका कर्मचा-्यांना आग लागल्या नंतर आला पालिका अधीक्षक उल्हास राठोड यांच्या नेतृत्वाखाली संतोष कानोडे, संग्राम नागरगोजे,बालू मंजलवाड,, चांदू राजकौर, विष्णू भिसे, नाना पौळ यासह कर्मचा-्यांनी तीन तास अथक मेहनत घेतली व आग आटोक्यात आणली यावेळी संबधित कचरा कंत्राटदार मदतीला धावला नाही की अभियंता यांनी कसे झाले याची विचारपूस केली नाही.एकंदरीत पालिका प्रशासनावर कोणाचाच वचक नाही आणि कोणाचाच पायपोस कोणाला नाही हे पुन्हा जनतेसमोर आले.काम करणारे कर्मचारी राबराबताहेत .त्यांची साधी नोंद होत नाही पालिका कारभारात शासकीय यंत्रणेची वचक राहिली नाही.

लाखो रुपयांचा खर्च घनकच-्यावर होती पण ओला – सुखा त्याचे विघटन त्यावर प्रक्रिया त्यातून खत निर्मिती हे सगळं कागदावर आठ महिन्याच्या या सर्व घनकचरा प्रक्रियेची तसेच . हळदव गावाच्या हद्दीत असलेले हे घनकचरा डेपो मुळे या भागात दुगंर्धी पसरते शिवाय येथील कबरस्थान मध्ये कचरा टाकला जात आहे त्याला आम्ही प्रतिबंध केला तरी ठेकेदार ऐकत नाही त्याला आम्ही वारंवार विरोध केला असे माजी सरपंच हरी पाटील शिंदे यांनी सांगितले .आता एकत्रित येऊन विरोध करावा लागेल शिवाय आज लागलेल्या आगीची माहिती मुख्याधिकार्यांना दिलीं.

शिरूर अनंतपाळ नगर पंचायत मधील भ्रष्टाचाराची चौकशी करावी. महाविकास आघाडी तर्फे महामोर्चा काढून कुलूप बंद आंदोलन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,418FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या