27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडगावठी पिस्टलसह एकास अटक

गावठी पिस्टलसह एकास अटक

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मागच्या काही महिन्यापासून गुन्हेगारी वाढली आहेÞ गुन्हेगार सर्रासपणे बेकायदेशीर शस्त्र बाळगुन शस्त्राचा धाक दाखवत नागरिकांत भिती निर्माण करीत आहेतÞ वाढते गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी संबंधीत पोलीस ठाण्यातील प्रमुखांना अवैध शस्त्र बाळगणा-याविरूद्ध कारवाईचे आदेश दिले. त्यावरून वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गावठी पिस्टल बाळगुन असलेल्या एका आरोपीस शुक्रवारी शहरातील गोवर्धनघाट पुला जवळून अटक केली.

जिल्हयामध्ये सध्या गणेशोत्सवाची धामधूम असून मोठ्या आनंदात हा सण साजरा होत आहेÞ सदर कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचीत घमा घडु नये त्याकरीता पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यातील प्रमुखांना पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगाराच्या याद्या अद्यावत करुन त्यांचेविरुध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही करणे, अवैध धंद्याविरुध्द कारवाईचे आदेश देत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना दिल्या.

सदर सुचनांचे अनुषंगाने वजिराबादचे पो.नि.जगदीश भंडरवार, पो.नि. दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सक्त आदेश देऊन वजिराबाद हद्दीत कोणत्याही प्रकारची अनुचीत घना घडणार नाही याकरीता परीणामकारक पेट्रोलींग करण्याबाबत आदेशीत केले.
दरम्यान दिÞ सप्टेंबर रोजी गुन्हे शोध पथकाचे सपोनि संजय निलपत्रेवार, पोना गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, पोकॉ संतोष बेलुरोड, शेख ईम्रान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम असे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, हरीष प्रकाश भगत ( रा. दिलीपंिसघ कॉलनी नांदेड) याच्याकडे एक गावठी पिस्टल असुन, तो सध्या गोवर्धनघाट जवळ असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली.

त्यावरुन जेतवन गोवर्धन घाट जवळील विहाराजवळ धाड टाकून आरोपी हरीष प्रकाश भगत यास पकडलेÞ त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या जवळ एक देशी लोखंडी बेकायदेशीरित्या बाळगलेले गावठी पिस्टल मिळुन आलेÞ सदर प्रकरणी आरोपीने बिनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी सपोनि निलपत्रेवार यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास प्रविण आगलावे, पोउपनि पो. ठाणे वजीराबाद नांदेड हे करीत आहेत. सदर कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, निलेश मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी शहर चंद्रसेन देशमुख यांनी पथकाच्या अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या