22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeनांदेडकायम स्थानिक कामगारांना कमी करण्याचा घाट

कायम स्थानिक कामगारांना कमी करण्याचा घाट

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : तालुक्यातील शहरापासून जवळच असलेल्या मौजे बाळापुर शिवारातील पायोनियर डिस्टिलरीज कंपनी लिमिटेड मधील प्रशासनात दक्षिण भारतीय असलेल्या अधिक-यांकडून आता कायमस्वरूपी एक्झिक्यूटिव्ह कामगार असलेल्या स्थानिक कामगारांना कंपनीतून कमी करण्याचा खटाटोप चालू असल्याचे धक्कादायक वृत्त हाती येत असून त्यासंदर्भात तालुकावासिय व लोकप्रतिनिधींनी जागरूक राहणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

पायोनियर कंपनीच्या स्थापनेच्या वेळी बहुतांशी शेतक-यांच्या जमिनी या कंपनीमध्ये गेल्या. त्यामुळे तत्कालीन पायोनियर प्रशासनाने सहानुभूतीने ज्या शेतक-यांच्या जमिनी या कंपनीमध्ये गेल्या त्यांच्या पाल्यांना कंपनीमध्ये नोकरी दिली. व त्यांना प्रशिक्षित करून हळूहळू पदोन्नती केली. दरम्यानच्या काळात पायोनियर कंपनीचे प्रशासन बदलत गेले. पायोनियर कंपनीबरोबर अनेक व्यवहार जागतिक स्तरावरील कंपन्यांसोबत झाले. मद्यसम्राट विजय माल्या यांच्याछइ कंपनीने ही कंपनी विकत घेतली होती. सद्यस्थितीत ऊकअॠएड या कंपनीने पायोनियर कंपनी घेतली. त्यामुळे अंतर्गत अमुलाग्र बदल झाले. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये दक्षिण भारतीय अधिका-यांचा भरणा आहे.

मॅनेजिंग डायरेक्टर अलोकेश बिश्वास, एच.आर. मॅनेजर नागराज, लाईन मॅनेजर चक्रपाणि. तर एच. आर. मॅनेजरचा असिस्टंट म्हणून एक महाराष्ट्रीयन पुणेरी व्यक्तिमत्व हेमंत कोंडाळकर म्हणून कार्यरत आहेत. या दक्षिण भारतीय असलेले चक्रपाणी व एम नागराज यांच्याकडून सतत कायमस्वरूपी कामगारांना मानसिक त्रास होत असतो. कामाचा अतिरिक्त बोजा यांच्यावर टाकला जातो. व ते न केल्यामुळे तुम्हाला नोकरीवरून काढून टाकण्यात येईल ही धमकी हमेशा देण्यात येत आहे. व त्यांना महाराष्ट्रीयन पुणेरी असलेल्या हेमंत कोंडाळकर हा अधिकारी सहकार्य करीत आहे. अतिरिक्त कामाचा बोजा हा जबरदस्तीने लादला जात आहे.

कंपनीच्या बदलत्या ध्येय- धोरणानुसार अतिरिक्त काम कशा पद्धतीने करावयाची असतात यासाठी त्याच्या विभागात काम करणा-या एक्झिक्यूटिव्ह कामगारांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. व त्यांचे हाताखाली इतर दोन ते तीन कामगार देणे गरजेचे असतानाही पायोनियर प्रशासनाने तसे न करता एकाच एक्झिक्यूटिव्ह कामगारावर हा कामाचा अतिरिक्त बोजा टाकून मानसिक त्रास देत आहेत. त्यांच्या या मानसिक त्रासामुळे ब-्याच कामगारांना अतिरिक्त ताण आल्याचेही विश्वसनीय वृत्त असून, ह्या कायमस्वरूपी कामगारांना काढून टाकून त्याजागी दक्षिण भारतीय कामगारांना आणून बसवण्याचा यांचा डाव असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. पायोनियर कंपनी ही मद्य बनवणारी मोठी कंपनी असून शासनास मोठा महसूलही देण्यास नंबर एक वर आहे. या कंपनीमध्ये वेगवेगळे विभाग असून त्यामध्ये एक्साईज, स्टोअर, मोलासेस प्रोसेस विभाग, ग्रेन प्लांट, टरबाइन, बॉयलर प्लांट, मेन इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट विभाग, वजन काटा विभाग, ऑफिस स्टाप, हॉस्पिटल, कॅन्टीन, हाउसकीपिंग, बॉटलींग, जॅकवेल, व सुरक्षा विभाग असे विभाग असून ब-याच विभागात तीन ते चार उपविभागही आहेत.

आणि त्या त्या विभागात कायमस्वरूपी कामगार काम करत असून त्यांची संख्या तब्बल ९३ आहे. अशा या कामगारांना लाईन मॅनेजर चक्रपाणी यांच्याकडून अतोनात त्रास होत असल्याचे वृत्त असून एच. आर. मॅनेजर एम नागराज व त्यांचा असिस्टंट हेमंत कोंडाळकर यांच्यामार्फत या कामगारांच्या संदर्भात असंख्य तक्रारी मॅनेजिंग डायरेक्टर लोकेश बिश्वास यांच्याकडे जात असून त्यांना कामावरून कमी करण्याच्या सततच्या धमक्या मिळत आहेत. भविष्यात ही कंपनी धर्माबादची म्हणून केवळ नामधारी राहणार असून या कंपनीत सर्वच प्रकारचे कामगार व कार्यालयीन कर्मचारी हे दक्षिण भारतीय राहणार एवढे मात्र निश्चित आहे.

मराठवाडा राष्ट्रीय पायोनियर डिस्टलरी कामगार संघ संलग्न(सिटू) शाखा धर्माबादचे तालुका अध्यक्ष यादवराव पवार यांच्याशी चर्चा केली असता घडत असलेला प्रकार अगदी बरोबर असून कामगार संघटना ही कामगारांच्या बाजूने समर्थपणे उभी असून अशा अधिका-यांना कालच समज देण्यात आली असून यावेळी संघटनेचे सचिव टी.रामुलु हे पण उपस्थित होते. कामगारांवर अन्याय होत असेल तर संपूर्ण कंपनीच बंद पाडू असा गर्भगळीत इशाराही त्यांनी दिला.

महाराष्ट्र कामगार कायदा अधिनियमाप्रमाणे पायोनियर डिस्टिलरीज कंपनीमध्ये स्थानिक कामगारांनाच प्राधान्य द्यावे असे असतानाही पायोनियर प्रशासनाने हे नियम पायदळी तुडवून दक्षिण भारतीय कामगारांची भरती चालू केली असून, कायम स्वरूपी कामगार सेवानिवृत्त होतात त्यांच्या जागी सेवाज्येष्ठतेनुसार इतर कामगारांना कायम न करता कंत्राटी कामगार कामगार नेमून कामे करत असल्याची धक्कादायक वृत्त असून, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सचिन रेड्डी चाक्रोड यांनी यासंदर्भात लेखी आवाज उठवला होता. पण नोकर भरतीच्या संदर्भात कुठलीच माहिती त्यांना अद्यापही पुरवण्यात न आल्याचे धक्कादायक वृत्त आहे. याचाच अर्थ या कंपनीमध्ये फार मोठे गौडबंगाल असून याचा पदार्फाश करण्यासाठी तालुका वासीय, स्थानिक प्रतिनिधींनी व लोकप्रतिनिधींनी जागरूक राहणे महत्त्वाचे आहे अशा प्रतिक्रिया आहेत.

दुहेरी मोक्कातील आरोपीसह तिघांना पकडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या