19.6 C
Latur
Tuesday, February 7, 2023
Homeनांदेडकुंटूर येथील घोंगडीची माळेगावात चमक

कुंटूर येथील घोंगडीची माळेगावात चमक

एकमत ऑनलाईन

कुंटूर : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथील मेंढीच्या केसापासून हातमागने बनवलेल्या घोंगडीचे प्रदर्शन माळेगावच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या बचत गट स्टॉल मिळाव्यात भरलेश. या मेळाव्यात मुख्य आकर्षण घोंगडीने ठरल्याने जिल्ह्यातील प्रकल्प अधिकारी व सर्व अधिका-यांनी घोंगडीचे कौतुक झाले. त्यांना घोंगडी अंगावर टाकून मपरेल बांधून फोटो काढण्याचा मोह त्यांना आवरला नाही. त्यामुळे माळेगाव यात्रेत भरलेल्या बचत गट मेळाव्यामध्ये मुख्य आकर्षण कुंटुरच्या घोंगडीने चमक दाखवली आहे.

कुंटुर येथील महालक्ष्मी महिला बचत गट व गिरजाबाई महिला बचत गटामार्फत गेल्या पाच वषार्पासून हाताने घोंगडी बनवले जाते . या घोंगडीसाठी मेंढीचे केसे कापून त्यापासून दोरा विणून सदर घोंगडी हाताने विणले जाते या घोंगडी विणण्यासाठी विज लागत नाही व कोणते यंत्रही लागत नाही. लाकडाने बनवलेल्या यंत्र हात माग याच्यामुळे सदर घोंगडी बनवले जाते. दोन्ही गटातील महिला घरी आपल्या मेंढ्या पालन केले जातात त्या मेंढ्याचे केस कापून त्या केसापासून दोरा वळून घोंगडी बनवले जाते. त्यामुळेही घोंगडी गेल्या पाच वर्षांपासून मुंबई महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्याच्या प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरली आहे.

त्याचबरोबर माळेगाव यात्रा तब्बल दोन वषार्नंतर या वर्षी भरले या माळेगाव यात्रेमध्ये सर्व बचत गटाचे स्टॉल व विक्रीसाठी आलेल्या वस्तूचे प्रदर्शन होते. यामध्ये मुख्य आकर्षण म्हणून घोंगडीला सर्व स्तरातून प्रतिसाद मिळाला असून, अधिका-यांपासून ते सर्व भाविक भक्तांनी घोंगडीचे कौतुक केले व विक्री प्राधान्य दिल्याने विक्रीही जोमात होत असल्याचे स्पष्ट प्रकल्प अधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे माळेगाव यात्रेतही कुंटूरच्या घोंगडीचे मुख्य आकर्षण ठरल्याचे कौतुक सर्वत्र होत असून, महिलांनी बनवलेल्या बचत गटाला सध्या मागणी होताना दिसत आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या