भोकर : तालूक्यात गेल्या दोन विसापासून पावसाची संततधार सुरू असून, शुक्रवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पुरपरीस्थितील निर्माण झाली होती़ तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर चरण्यासाठी गुरे घेवून जाणा-या ऐका महिलेसह तिचा मुली वीज कोसळल्याने यात १३ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दि़९ जूलै रोजी भूरभूसी येथे घडली.
भोकर तालूक्यातील मौजै भुरभुसी येथे दि. ९ रोजी सकाळी ११.३० वाजताच्या दरम्यान पावसाच्या थोड्या विश्रांतीनंतर एक महिला व तिची मुलगी जनावर गुर घेऊन शेतात निघाले असता, अचानक ढगांमध्ये विजेचा कडकडाट सुरु झाला. तेवढ्यात या दोघा मायलेकीवर वीज कोसळली़ यात आई चंद्रकलाबाई गमेवाड गंभीर जखमी झाली तर मुलगी आडेला नारायण गमेवाड (वय १३) ही जागीच ठार झाली. यातील जखमी महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.