25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडमहाराष्ट्र शुगरचे दोन कोटी शेतक-यांना द्या अन्यथा काळे फासू : इंगोले

महाराष्ट्र शुगरचे दोन कोटी शेतक-यांना द्या अन्यथा काळे फासू : इंगोले

एकमत ऑनलाईन

नांदेड : महाराष्ट्र शुगर कारखान्याचे एफआरपीपोटी आलेले दोन कोटी रुपये येत्या आठ दिवसांत शेतक-यांना देण्यात यावेत अन्यथा प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील अधिका-यांच्या तोंडाला काळे फासू असा संतप्त इशारा शेतकरी शेतमजूर सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांनी दिला.

परभणी जिल्ह्यातील महाराष्ट्र शुगर साखर कारखाना विक्रीतून शेतक-यांची देय रक्कम निर्धारित केलेले दोन कोटी रुपये गेल्या वर्षभरापासून परवाने जिल्हाधिकारी कार्यालय व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय यांच्याकडे पडून आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परभणी व प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय नांदेड या दोन कार्यालयातील अधिका-यांच्या विसंवाद व निष्काळजीपणामुळे ही रक्कम शेतक-यांना अद्याप मिळालेली नाही याचा जाब विचारण्यासाठी बुधवारी शेतकरी शेतमजूर शेतकरी शेतमजूर सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शेतक-यांच्या शिष्टमंडळाने साखर सहसंचालक बालाजी वांगे यांना घेराव घालून जाब विचारला.

येत्या आठ दिवसांत दोन कोटी रुपये शेतक-यांना मिळाले नाहीत तर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन करून कार्यालयाला टाळे ठोकण्याचा व दिरंगाई करणा-या अधिका-यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा शिवसेना शेतकरी शेतमजूर सेनेचे प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद इंगोले ,गोपनपल्ले ,देवराव गुंतापल्ले, देविदास गंड्रस, तिरुपती कु-र्हे पाटील, नितीन गोडसे, बालाजी नव्हाते उपस्थित होते .

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या