Thursday, September 28, 2023

अन्य महामंडळांना मुदतवाढ द्या

नांदेड : राज्यातील मुदत संपलेल्या मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासह अन्य महामंडळाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे शुक्रवारी एका पत्राद्वारे केली असुन या संबंधी ते लवकर राज्यपाल व मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात आले.

भारताचे महामहिम राष्ट्रपती यांच्या आदेशाने व राज्य शासनाच्या मंजूरीने राज्यातील विविध भागांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी राज्यातील अनेक भागामध्ये वैधानिक विकास महामंडळाची स्थापणा करण्यात आली असुन या महामंडळाचा कार्यकाळ ३०( एप्रिल २०२० रोजी पुर्णत्वास आला आहे. राज्यात मागासलेल्या मराठवाड्याच्या विकासाचा अनुशेष मराठवाडा विकास वैधानिक महामंडळाच्या वतीने भरुन काढल्या जातो.

मराठवाडा विकास वैधानिक महामंडळाच्या वतीने मराठवाडयचा कांही अनुशेष भरुन निघाला आहे तर सिंचन उद्योग,शेती,रस्ते या बाबतीतील प्रचंड भौतीक व आर्थीक अनुशेष अजूनही कायम असुन यासाठी शासनाने मराठवाडा वैधानिक विकास महामंडळासह अनय्‍ महामंडळाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी नांदेडचे खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

वैधानिक विकास महामंडळाच्या मुदतवाढी संबधी ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेणार असल्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगीतले़

Read More  भोकर-किनवटमध्ये बाजारात तोबा गर्दी

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या