हदगाव :कोठेही घटना घडल्यास त्या घटनेची माहिती पोलिसांना मिळावी यासाठी संबंधित यंत्रणेकडून आपत्कालीन क्रमांक म्हणून ११२ हा नंबर चा वापर केला जातो.या नंबर ने घटनेची माहिती मिळताच पोलिस यंत्रणा त्या घटनास्थळी दाखल होत असते.
मनाठा पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात बामणी तांडा येथील आकाश साहेबराव आडे या युवकांनी ११२ या क्रमांकावर फोन करून बामणी तांडा येथे भांडण व हाणामारी होत असल्याची माहिती मनाठा पोलीस स्टेशनला टोल फ्री ११२ या क्रमांकावर माहिती दिल्याने पोहॅको नरवाडे व पोहॅको हटकर घटनास्थळी वाहन घेऊन दाखल झाले. परंतु सदर ठिकाणी कोणतीही अनुचित प्रकारकिंवा भांडण झाले असल्याचे आढळून आले नाही.
कॉलर इसम आकाश साहेबराव आडे यास पोलिसांनी विचारपूस करून ११२ कॉल संबंधने माहिती घेतली असता त्याने सर्व प्रथम उडवाउडवीचे दिले.सदर इसमाविषयी गावातील वर्तणूक विषयी पोलीसांनी माहिती घेतली असता त्याने यापूर्वीही१०८ क्रमांकावर फोन करून विनाकारण गावांमध्ये ॲम्बुलन्स बोलल्याचे समजले.
तर त्याला पोलिसांना खोटी माहिती देणे चांगलेच महागात पडले असुन याप्रकरणी ठाणेदार विनोद चव्हाण यांच्या आदेशान्वये पोलीसांनी यांच्याविरुद्ध कलम १८२- १७७ भारतीय दंड संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास मनाठा पोलीस स्टेशन करीत आहेत.