हिमायतनगर(प्रतिनिधी ) नगरपंचायत ची प्रभाग रचना व आरक्षण सोडत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक 27 रोज शुक्रवार रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हिमायतनगर येथील तहसील कार्यालय येथे संपन्न झाला या मध्ये 17 पैकी 9 ठिकाणी महिलांसाठी आरक्षण सोडण्यात आले तर 8 ठिकाणी पुरुषा साठी प्रभाग निहाय आरक्षण उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी राजेंद्र खंदारे व हिमायतनगर नगरपंचायत च्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांनी जाहीर केले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पन्नास टक्के जागा महिलांना आरक्षित झाल्याने गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक दिग्गज व आजी माजी यांच्या इच्छुकांच्या चेहरे ईश्वर चिठ्ठीमुळे धुळीस मिळाले आहेत
हिमायतनगर नगरपंचायत झाल्यानंतर 2015 मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाली त्यानंतर पाच वर्षाचा कालावधी संपल्याने आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम तहसील कार्यालय येथे जाहीर जाहीर करण्यात आला त्यात प्रथमतः वार्ड क्रमांक सहा अनुसूचित जाती महिला व वार्ड क्रमांक 17 अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव करण्यात आले त्यानंतर प्रभाग क्रमांक एक नागरिकांना मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक दोन सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक तीन नागरिकांना मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक चार सर्वसाधारण महिला ,प्रभाग क्रमांक पाच सर्वसाधारण ,प्रभाग क्रमांक सहा अनुसूचित जाती महिला ,प्रभाग क्रमांक सात सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक आठ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 10 नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 11 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 12 नागरिकास मागास प्रवर्ग महिला, प्रभाग क्रमांक 13 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 14 सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक पंधरा सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व प्रभाग क्रमांक 17 अनुसूचित जमाती च्या महिले साठी राखीव करण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी तथा पीठासीन अधिकारी राजेंद्र खंदारे व हिमायतनगर नगरपंचायत च्या कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी स्नेहलता स्वामी यांनी जाहीर केले
यावेळी सहाय्यक कार्यालय अधीक्षक रत्नाकर डावरे साहेब, लेखापाल बालाजी माळसापूरे,अभियंता रफीक अहेमद ,रमाकांत बाचे, शेख मेहबूब, मारोतराव हेंद्रे ,बालाजी हर डप कर, विठ्ठल शिंदे, श्याम पाटील, श्याम मं डोजवार, संदिप उंबरे ,अपरेटर तमजिद खान, उमेश भडके, शेख मुख्तार, कपिल हेंद्रे ,राहुल सर्जेराव, सागर भाई भालेराव ,दिलीप जोंधळे, यांच्या सह शहरातील नागरिक तसेच पत्रकार बांधव यांची उपस्थिती होती