22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडदादा गेले...भाजपाचे चांगभले झाले

दादा गेले…भाजपाचे चांगभले झाले

एकमत ऑनलाईन

नांदेड (सुनिल पारडे) : दर्शनापुर्वी दारात अडविले जात असल्याचा आरोप करित सात वर्षापुर्वी दादांनी भाजपात प्रवेश केला होता.मात्र एका पक्षात राहून दुस-या पक्षाचे काम करणारे असा आरोप झालेल्या दादांनी पुन्हा खासदारांच्या एकाधिकारशाही कंटाळलो असे कारण देत कॉगे्रस वापसीचा निर्णय जाहीर केला आहे.यामुळे भाजपाचे निष्ठावंत पदाधिकारी,कार्यकर्ते सुखावले असून दादा गेले अन् भाजपाचे चांगभले झाले अशी चर्चा देगलूर,बिलोलीसह जिल्हयात होत आहे.

गेल्या अनेक वर्षात अपवाद वगळता नांदेड जिल्हा हा काँगे्रसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.परंतू सात वर्षापुर्वी दिग्गज दादांनी माजी आमदारासह काही पदाधिका-यांना सोबत घेऊन जिल्हयात कॉगे्रसला पहिल्यांदा खिंडार पाडले.२०१४ साली लोकसभा निवडणुकीत कॉगे्रसचा दारूण परावभ झाला.राज्यात ही भाजपची सत्ता आली होती.यामुळे दादासह या मंडळीने भाजपात प्रवेश केला. तेव्हापासून निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते प्रंचड नाराज झाले होते.यात जवळपास सात वर्ष राज्यस्तरावर मोठे पद घेऊन सुद्धा एका पक्षाचे नाव अणि दुस-या पक्षाचे काम असा कारभार सुरू होता.याचा काही निवडणूकीत फटकाही बसला.

यामुळे देगलूर बिलोलीसह नांदेड जिल्हयातील काही भागातील निष्ठावंत कार्यकर्ते इच्छा असून पक्षाचे काम करता येत नसल्याचे त्रस्त झाले होते.अखेर सात वर्षांनंतर दादांनी खासदारांच्या एकाधिकारशाहीला कंटाळलो असे कारण देत कॉग्रेस वापसी करण्याचा निर्णय जाहीर केला.यामुळे भाजपाचे निष्ठावंत पदाधिकारी,कार्यकर्ते सुखावले असून दादा गेले अन् भाजपाचे चांगभले झाले अशी चर्चा देगलूर,बिलोलीसह जिल्हयात होत आहे.भाजपात अजूनही असे काही घरभेदी असतील तर ते पक्षासाठी घातक ठरतील.त्यामुळे त्यांचा शोध घेऊन त्यांचा पक्षाबाहेर करावे अशी मागणी निष्ठावंत कार्यकर्त्यांकडून होत आहे.

तर दादांच्या ओझ्यामधून तनावमुक्त झाल्यामुळे देगलूर विधानसभा मतदार संघात काम करण्यास मोकळे झाले असून भाजपचे उमेदवार निश्चित निवडून येतील असा दावाही कार्यकर्ते करित आहेत.देगलूर पोटनिवणूकीची रणधुमाळी सुरू होताच नांदेड जिल्ह्यात राजकीय भुंकपाचे हादरे बसण्यास सुरूवात झाली आहे.सात वर्षापुर्वी सर्वप्रथम काँगे्रसला खिंडार पाडून भाजपात प्रवेश केला होता.ती मंडळी पुन्हा काँगे्रस वापसी करित आहेत.भाजप खा.प्रताप चिखलीकर व पालकमंत्री अशोकराव या दोन नेत्यांच्या लढाईमुळे देगलूरची पोटनिवणूक आता चुरशीची बनली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या