23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील ३ हजार ७३९ शाळांमधून देशभक्तीपर गीतांचे समूहगान

नांदेड जिल्ह्यातील ३ हजार ७३९ शाळांमधून देशभक्तीपर गीतांचे समूहगान

एकमत ऑनलाईन

नांदेड : भारतीय स्­वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्­हा परिषदेच्­या शिक्षण विभागाच्­या वतीने उद्या बुधवार दिनांक १० ऑगस्­ट रोजी जिल्­हयातील ३ हजार ७३९ शाळांमधून देशभक्­तीपर गीतांचे समूहगाण या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्­यात आले असून शिक्षण विभागाने संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली आहे.

हर घर तिरंगा या उपक्रमातंर्गत बुधवारी सकाळी १० वाजता १० देशभक्ती गीतांचे समूह पद्धतीने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनांच्या ३ हजार ७३९ शाळांमधून देशभक्तीपर समूहगीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. जिल्­हाधिकारी विपीन ईटनकर व मुख्­य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्­या संकल्­पनेतून हा उपक्रम जिल्­हयाती सर्व जिल्­हा परिषद व खाजगी शाळांमधून राबविण्­यात येणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या २ हजार १९७ शाळा, महानगरपालिकेच्या १७ तर १ हजार ५२५ संस्थेच्या शाळा असे एकूण ३ हजार ७३९ शाळा सहभागी होणार आहेत.

देशभक्तीपर समूहगीत गायनात एकाच वेळी सर्व शाळांमधून सुमारे ६ लाख ६७ हजार ७२१ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी १० देशभक्­तीपर गीत समूह स्­वरात विद्यार्थी गाणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या