नांदेड : नांदेड येथील सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा यांचे दि.१२ जुलै रोजी रात्री दीड वाजेच्यासुमारास रेल्वेतून प्रवास करताना झालेल्या अपघातात निधन झाले. ही घटना जालना रेल्वेस्थानकाच्या जवळील होळी रेल्वेस्टेशनवर खाली उतरत घडली. नांदेड गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ सुरजितसिंघ वाधवा (वय ५६) हे दि.११ जुलै रोजीच्या राज्यराणी एक्सप्रेस रेल्वेने मुंबईसाठी प्रवासाला निघाले होते. ही रेल्वे रात्री १ वाजेच्या सुमारास जालना रेल्वे स्थानकापुर्वी असलेल्या कोडी रेल्वे स्थानकावरून न थांबता पुढे गेली.
गाडी पुढे गेल्यावर रेल्वेच्या कर्मचा-यांना रेल्वे रुळांजवळ एक माणुस पडलेला दिसला. रेल्वे कर्मचा-यांनी याबाबतची माहिती रेल्वे पोलीस ठाणे औरंगाबादकडे दिली. यानंतर जालना येथील रेल्वे पोलीसांनी पुढील कायदेशीर कारवाई केली. प्राप्त माहितीनुसार गुरविंदरसिंघ वाधवा ज्या वातानुकूलीत कक्षातून प्रवास करत होते. त्यांचे बॅग आणि मोबाईल तसाच रेल्वेत पुढे गेला. पण कल्याण रेल्वे स्थानकावर ते साहित्य रेल्वे पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतले. गुरुद्वारा बोर्डाच्या अधीक्षक पदावर वाधवा यांनी सन २०१८ पासून सलग तीन वर्ष कार्य केले.त्यांच्या कार्यकाळात नांदेड येथील गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या वतीने भाविकांसाठी अनेक महत्वाचे निर्णय झाल.े याअपघाती निधनामुळे नांदेड परिसरासह सिख भाविकांनी दु:ख व्यक्त केले. मंगळवारी दुपारी जालना येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले., अशी माहिती गुरुद्वारा बोर्डाचे पीआरओ चरणसिंघ सोडी यांनी दिली.