29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडगुरुद्वारा कन्टेनमेन्ट झोन २८ दिवस कायम

गुरुद्वारा कन्टेनमेन्ट झोन २८ दिवस कायम

एकमत ऑनलाईन

नांदेड : विशेष प्रतिनिधी
संपूर्ण राज्यात अनलॉक डाऊ न-१.0 सुरु झाले आहे. परंतु कन्टेमेंट झोनमध्ये कुठलीही तरतूद शासनाने दिलेली नाही. केवळ कन्टेमेंट झोन वगळता वेळेनुसार मुभा देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात २0 ठिकाणी कन्टेमेंट झोन आहे. त्यापैकी पिरबुºहाणनगर परिसरातील कन्टेमेंट झोन २८ दिवसानंतर काढण्यात आले. त्याच धरतीवर आज गुरुद्वारा परिसरातील कोरोना बाधीत रुग्ण मुक्त झाला असल्यामुळे आजपासून २८ दिवसानंतरच गुरुद्वारा परिसरातील कन्टेमेंट झोन काढण्यात येईल. केवळ राजकीय दबाव आणण्याचा कुणी प्रयत्न करीत असतील तर तो यशस्वी होणार नाही. शासन नियमानुसारच सर्वत्र कन्टेमेंट झोन सारखा राहिल. त्यामुळे गुरुद्वारा परिसरातीतल कन्टेमेंट झोन २८ दिवसापर्यंत काढता येणार नसल्याचा फतवा जिल्हाधिकारी डॉ. विपीन, पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी काढल्यामुळेआता या विषयावर पूर्णविराम मिळाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या जवळपास १५0 पर्यंत पोहंचत आहे. बाजूच्या जिल्ह्यातील काही ठिकाणी कन्टेमेंट झोन काढण्यात आल्यामुळे त्या ठिकाणी कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सर्वप्रथम नागरिकांच्या आरोग्यास प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे प्रशासन दिवस रात्र प्रयत्न करत आहे. यासाठी नागरिकांनी देखील स्वयंस्फुर्तीने प्रतिसाद देणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी कोरोना बाधीत रुग्ण सोपडले नाहीत त्या परिसरात आज व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न चालु आहे. नाहक कोणालाही त्रास व्हावा असा प्रशासनाच्या विचाराधीन नाही. गुरुद्वारा परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्यामुळे या परिसराला कन्टेमेंट झोन करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळी या परिसरातील कोरोनाबाधीत रुग्ण मुक्त झाल्यामुळे २८ जून पर्यंत हा परिसर व्यवहारासाठी मुक्त करता येणार नाही. त्याच प्रमाणे लंगर साहेब गुरुद्वाराचे संत बाबा बलविंदरसिंघजी यांच्याशी तिन्ही अधिकाºयांनी संपर्क साधून विनंती केली आहे की, बाहेर राज्यातून येणाºया भक्तांना गुरुद्वारामध्ये संत गुरुगोविंदसिंघजी यांच्या समाधीवर मथ्था टेकवता येणार नाही. त्यामुळे संत बलविंदरसिंघजी बाबा यांनी जाहिरपणे सर्व भक्तांना विनंती करुन गुरुद्वारा परिसरात येवू नये असे सांगावे अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली असली तरी संत बलविंदरसिंघ बाबा यांनी सचखंड गुरुद्वाराचे पंचप्यारे साहिब यांच्यांशी चर्चे अंतीच जाहिर आवाहन करण्यात येईल असे सांगितले.

Read More  परभणीत पहिल्याच दिवशी सोशल डिस्टन्सिंगचा उडाला बोजवारा

त्यावेळी प्रशासनाने त्यांना सचखंड गुरुद्वारा परिसरात घेवून गेले असता त्यावेळेस पंचप्यारे साहिब सेवेत असल्यामुळे त्यांना वेळ देवू शकले नाहीत.यामुळे ही चर्चा अपुरी राहिली असली तरी लवकरच त्यांच्याशी चर्चा करुन संयुक्तरित्या आवाहन करण्यात येईल.असे आश्वासन संत बलविंदरसिंघजी बाबा यांनी प्रशासनाला दिल्यानंतरच प्रशासन त्या ठिकाणाहून रवाना झाले.  यावेळी सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांनी देखील प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कुठल्याही परिस्थितीत २८ दिवसापर्यंत या परिसरात व्यवहार चालु होणार नाहीत. भक्तांना देखील गुरुद्वारात प्रवेश दिला जाणार नाही.. असे आश्वासीत केले.

या भेटीच्या वेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक संतोष राठोड, उपविभागीय अधिकारी पठाण, उपपोलिस अधीक्षक पाटील, स्थानिक गुन्हा शाखाचे पो.नि. चिखलीकर, पोलिस निरीक्षक देशपांडे, वजिराबाद पोलिस निरीक्षक शिवले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अधिका-याचा अति उतावळीपणा…!
कन्टेमेंट झोनमध्ये कुठल्याही प्रकारची बैठक लावता येत नाही. परंतु एका अधिकाºयाने या परिसरात काही निवडक पत्रकारांना बोलावून जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, मनपा आयुक्त वार्तालाप करुन पाहणी करणार आहेत. सोबत सचखंड गुरुद्वाराचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई व लंगर गुरुद्वाराचे संत बलविंदरसिंघजी बाबा हे उपस्थित राहणार आहेत यासाठी कन्टेनमेंट झोनमध्ये एक मोठा टेबल, १0 ते १२ खुर्च्या, माईक व पाणी पिण्याची व्यवस्था केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केल्या जात होते. कन्टेमेंट झोनमध्ये बैठक घेता येते का असा सवाल उपस्थित पत्रकाराने करताच पोलिस अधीक्षकाने संबंधीत अधिकाºयाला चांगलेच सुनवत ही काही शांतता कमिटीची बैठक आहे का आणि ते देखील कन्टेमेंट झोनमध्ये. काही आपणास समजते का एखाद्याने फोटो काढल्यास कायम स्वरुपी घरी जाताल याचे भान ठेवा असे सुनावताच संबंधीत अधिका-याने तात्काळ खुच्या व टेबल जिल्हाधिकारी येण्यापुर्वीच उचलल्यामुळे पुढील प्रसंग टळला.

बाबा काही ऐकेनात… पोलिस अधीक्षक काही सोडेनात
नांदेड गुरुद्वारा परिसरात कन्टेमेंट झोन आहे. त्यामुळे जगभरातील भक्तांनी नांदेड येथे येऊ अशी जाहिर विनंती व्हिडिओ मार्फत करावी असे सातत्याने पोलिस अधीक्षक संत बविंदसिंघजी बाबा यांना सांगत होते. परंतु बाबा यांनी मात्र आम्ही संयुक्तपणे आवाहन करुत. आपण त्यांच्याशी संपर्क साधावा असे म्हणताच पोलिस अधीक्षकांनी त्यांना सचखंड गुरुद्वाºयाचे पंचप्यारे साहिब यांच्याकडे घेवून गेले असता पंचप्यारे हे सेवेमध्ये असल्यामुळे भेट होवू शकली नाही. तरी देखील पोलिस अधीक्षक यांनी तुम्ही एकटे विनंती करा असे सांगत होते. परंतु बाबा यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ देण्यास नकार दिला. त्यामुळे बाबा काही ऐकेनात… पोलिस अधीक्षक काही सोडेनात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर शेवटी पोलिस अधीक्षकांनी या ठिकाणी एखादा जरी कोरोना बाधीत निघाला तर आपल्यावर सर्व जबाबदारी राहिल असे ठणकावत आपली बाजी मारुन नेल्यामुळे पोलिस अधीक्षकांचे कौतुक झाले.त

१६ रुग्णांना रुग्णालयातून सुटी; ३ जण पॉझिटिव्ह
कोरोना विषाणुची बाधा झालेल्या सोळा रुग्णांना सोमवारी रुग्णालयातून सुट्टी मिळाली असून या रुग्णांच्या परिवारातील सदस्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र सोमवारी प्राप्त अहवाला पैकी तीन जण पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात सोमवारी १ जून रोजी सायं. ५ वा. प्राप्त झालेल्या ११६ अहवालापैकी १०८ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन ३ रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता १४९ झाली आहे. या तीन रुग्णांपैकी २५ व ३५ वर्षांचे दोन पुरुष रुग्ण हे देगलूर नाका येथील तर ४० वर्षे वयाचा एक रुग्ण शिवाजीनगर नांदेड येथील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १२० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

सद्यस्थितीत रुग्णालयात २१ रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. या रुग्णांपैकी तीन रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात ५२ व ६५ वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर ३८ वषार्चा एक पुरुष रुग्ण आहे. आतापर्यंत एकूण १५९ रुग्णांपैकी ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून १२० रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. यापुर्वी शिवाजीनगर भागात राहणारे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांना कोरोना संक्रमन झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर शिवाजीनगर, नईआबादी भागात आणखी एक रुग्ण पॉझिटीव्ह आढळला आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या