हदगाव : तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत गणल्या जाणाऱ्या तामस्यात हिमायतनगर येथून गुटखा आणून खुलेआम मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत महाराष्ट्रात गुटखा बंदी असली तरही हिमायतनगर येथून गुटखा आणुन तामस्यात गुटख्याची दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली असल्याचे बोलल्या जात आहे.तामसा सर्कल हे तालुक्यात सर्वात मोठे असून अनेक ग्रामीण गावे तामस्याला जोडली गेली आहे.त्यामुळे येथे मोठी बाजारपेठ असल्याने गुटखा माफियावाले पुरेपूर फायदा घेत आहेत.
दररोज रात्री बारा वाजता जुने बस्थानक गोळीभांडारच्या नावाखाली वाहनातून आष्टी मार्गाने वाहतूक सुरू असते अनेक वेळा लोकांच्या नजरेत येते परंतु गोळीभांडरचा माल आहे असे सांगून पळ काढल्या जातो गोळीभांडरच्या बाजूलाच किरायाने रूम करून गुटख्याचा सर्व माल ठेवला जातो व सकाळी सर्कल मधील पंचवीस ते तीस खेड्यात गुटख्याचा माल घर पोच पोहचती केला जातो अनेक दिवसांपासून तामस्यात अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कारवाई थांबल्याने गुटखा विक्रीत्याचे जाळे पसरले आहे.एवढी मोठी गुटख्याची डील होत असताना अधिकारी आर्थिक देवाण घेवाण पोटी लोकांचे घरे जाळीत आहेत.
सर्व अधिकाऱ्यांना गोळीभांडर च्या आड गुटख्याची विक्री होत असताना माहीत असताना सुध्दा आता पर्यत मोठी कारवाई का केली नाही असाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे.गुटखा विक्रेता गोळीची विक्री करतो असे सांगून प्रशासनाची बनवा बनवी करीत आहे.अधिकारी थातुरमातुर कारवाई करून गुटखा माफियांना सोडत असल्याने त्यांना गुटखा विक्रीस अभय देत आहेत तामस्यात पान टपरी व किराणा दुकानात गुटखा सहज मिळत असल्याने परिसरातील अनेक शाळकरी विध्यार्थी या गुटख्याच्या आहारी जाऊन आपले जीवन बरबाद करीत आहेत सकाळी चार वाजता आपल्या घरातून गुटखा काढला जातो व सात वाजेपर्यंत सर्व दुकाने पान टपऱ्या पर्यत माल पोहचतो यांचा कुणालाच थांगपत्ता लागत नाही की जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते की काय असेही जनतेतून बोलल्या जात आहे.अश्या मुजुर गुटखा माफियावर अन्न व औषध विभागाच्या अधिकाऱ्यांनी कडक कारवाई करावी अशी मागणी तामसा परिसरातील जनतेतून होत आहे.
बांधकाम मजुरांच्या योजनांवर कामगार अधिकारी, दलालांचा डल्ला