23.2 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडबिलोली तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री

बिलोली तालुक्यात गुटख्याची सर्रास विक्री

एकमत ऑनलाईन

बिलोली : राज्यात गुटखा बंदी होऊन अनेक वर्ष होऊन गेले पंरतु बिलोली तालुक्याला गुटखा बंदी म्हणजे काय हे अजून तरी माहीत नसून कुठल्याही अडचणी विणा सर्रास पणे शेजारच्या तेंलगणा व कर्णाटक राज्यातुन गुटख्याची आयात होत असून या गोरख धंद्याला अन्न व भेसळ प्रतिबंध अधिका-यांसह बिलोली पोलीसांचा याला अटी व शर्तीसह पुर्णपणे पाटींबा असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात गुटखा बंदी होऊन सात वर्षाच्या जवळ होत आलीत या सात वर्षात राज्य सरकारकारचा कोट्यावधी रुपयाचा महसुल बुडाला आहे. महसुल बुडून ही याची कडक अमलंबजावणी होत नसल्याने या बंदीचा काय उपयोग असा प्रश्न उपस्थित झाला असून गुटखा तर कसा ही मिळतच आहे उलट राज्यात चालु असल्यास कमी दराने तरी मिळत होता पण आता किमतीच्या दुप्पट तिनपट पैसे शौकीनाला मोजावे लागत आहे.आणि इकडे सरकारचा महसुल बुडत आहे,तर हे खावुन दुर्धर आजाराला आमंत्रण देण्यात येत आहे,सर्वसामान्य व्यक्ती हा सरकारी दवाखान्यात गेल्यावर सरकारला खर्च ही करावे लागत आहे, त्यावर किती तरी पटीने खर्च होत आहे, म्हणजे शेवटी सरकारला या बंदी मागचा उपदेश काय व फायदा काय असाच प्रश्न निर्माण झाला आहे.यात एवढे मात्र होत आहे की,अन्न व भेसळ प्रतिबंध अधिकारी व पोलीसांचे चांगभले होताना दिसून येत आहे.

बिलोली तालुका हा तेलंगणा ला लागून तर कर्णाटक राज्याच्या शेजारी असल्याने याचा फायदा या गुटखा माफीयाला होत आहे,या राज्यातुन विस ते पंचवीस लाखाचा माल एक एका वाहणा द्वारे येत असून या वाहतुकीला कोणतीच अडचण येत नसल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.येरवी शेळीच पिल्लु जावु न देणारे बिलोली व कुंडलवाडी पोलीस मात्र एवढ्या मोठ्या टेम्पो, पिकअप मधुन येणारा गुटखा का दिसत नाही हा न उलगडणारा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील बिलोली, कुंडलवाडी शहरासह, कासराळी, लोहगाव, सगरोळी, सावळी, आदमपुर, रामतिर्थ, कार्ला फाटा,आरळी सह आदी गावात खुटखा विक्रेत्याने बस्तान मांडले आहे. या विक्रेत्याने संपुर्ण तालुक्यातील खेडोपाडी हा गुटखा घरपोच करीत असल्याचे चित्र दिसत असून लाखो रुपयाची उलाढाल यातुन होत असल्याचे पहावयास मिळत आहे.जिल्हात अनेक ठिकाणी धाडी पडल्या पण आज पर्यत सांगुन घेण्यास एक ही धाड बिलोली तालुक्यात पडली नसल्याने हि फार मोठी शोकांतीका समजाव की कर्तव्य दक्ष अधिकारी सक्षम आहेत हे समजाव हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

भाजप वोट बँकेच्या राजकारणाला घाबरत नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या