23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home नांदेड बिलोली तालुक्यात गुटख्याची खुलेआम ठोक विक्री

बिलोली तालुक्यात गुटख्याची खुलेआम ठोक विक्री

एकमत ऑनलाईन

बिलोली : तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटख्याच्या ठोक विक्रेत्यांकडुन खुलेआम विक्री होत आहे. विक्रेत्यांनी आपल्या घरात गुटख्याची मोठी साठवणुक केलेली आहे. मात्र पोलीसांची अर्थपुर्ण मुकसंमती मिळत असल्याने कुठलीही मोठी कारवाई होत केली जात नाही,असा आरोप नागरिकांमधून होत आहे.दरम्यान गुटख्याची सर्व आयात ही शेजारच्या तेलंगणा राज्यातुन होत आहे.

राज्यात गेल्या अनेक वर्षा पासुन गुटखा विक्री वर बंदी आहे,तात्कालीन कै.विलासराव देशमुख यांच्या सरकारने राज्यात गुटख्यावर बंदी आनली होती सरकारचा करोडो रुपयाचा महसुल बुडवुन राज्यातील जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले होते,हा गुटखा खाण्यात वयस्करासह पंधरा ते विस वयोगटातील तरुणांचा अधिक भर असल्याचे दिसुन येत आहे.गुटख्यामुळे मानवाच्या शरीराची काय हाल होते हे सांगण्यासाठी कोणत्या जोतीष्याची आवश्यकता नाही पण आपली पोळी भाजवुन घेण्यासाठी स्थानिक अधिकारी जनतेच्या जिवाशी खेळत आहेत. गुटखा बंद झाल्यापासुनच हळुहळु छोट्या माशांनी आपले जाळे पसरवले होते.

अगोदर दुचाकी वरुन ही आयात होयाची त्याचे रुंपातर आता मालवाहु वाहतुकीत झाले असुन छोटे असलेले मासे ही आता मोठ्या माशात बदल झाला आहे.जिल्हयात आजपर्यत शेकडो ठिकाणी गुटख्याच्या विक्री ठिकाणी धाडी घाऊन करोडो रुपयाचा जप्त केला.अनेकांना गजाआड करण्यात आले.परंतू बिलोली तालुक्यात एखाद्या छोट्या व्यापा-यावर बोलनी फिसकटलीतरच अपवादात्मक कारवाई झाली असेल पण मोठी कारवाई तालुक्यात कुठेही झालेली नाही .यामुळेच पोलीस व अन्न व औषध विभागाची मुकसंमती मिळते की काय अशी शंका येत आहे. यामुळेच ठोक विके्रत्याकडून खुलेआम गुटका विक्री केल्या जाते.

शेजारील तेलंगणातुन मोठामोठ्या वाहनातुन गुटखा आनला जातो येसगी पाईंटवर पोलीसांची गस्त आहे त्यापुढे महाराष्ट्र चेकपोस्ट आहे मग चेकपोस्ट काय करत आहे ? अशा वाहनासाठी महाराष्ट्र चेकपोस्टवर रस्ता तयार करुन दिला आहे.दोन्ही टोल साईडच्या मधोमध अगोदरचा एक रस्ता असुन अशा नंबर दोनच्या वाहनासाठी हा पर्यायी रस्ता उपलब्ध आहे.तेथुन गुटखा विके्रते आपले काम फत्ते करताना दिसुन येत आहे. समाजाचे आरोग्य बिघडवून लाखो तरूणांना आयुष्यातून बर्दाब करणा-या या गुटखा माफियांना बंदोबस्त थेट पोलीस अधिक्षकांनी करावा अशी मागणी होत आहे.

हार्दिक बनेल भारताचा ग्लोबल स्टार : मायकल वॉन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या