नरसीफाटा: राज्यातील गुटखा बंदी आदेशाला केराची टोपली दाखवून नरसी व येथे होलसेल गुटखा पुरवठा करणारे एजंट सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. मात्र या अवैध गुटखा विक्रीकडे पोलीस व अन्न औषधी विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरीकांतून केला जात आहे .
कोरोना महामारीला रोखण्यासाठी म्हणून मागील २२ मार्च पासून लॉकडाउन सत्र सुरु झाले . याचाच फायदा घेत नरसी व नायगाव येथील गुटखा पुरवठा करणारे काही एजंट शेजारच्या राज्यातून रातोरात विवीध प्रकारचा माणिकचंद , गोवा , सागर , आदत नावाचा गुटखा आणून सकाळच्या भल्या रामप्रहरी दुचाकीद्वारे जायमोक्यावर जावून किरकोळ दुकानदार व पानटपरीवाल्यांना अगदी खेड्यापाड्यातही गुटखा पुरवठा करण्याचा गोरखधंदा मोठ्या जोमाने करीत आहेत.
मात्र कर्तव्यावर आसणारे नरसी पोलीस चौकीचे बीटप्रमुख व ठाणेप्रमुख यांसह पोलीस कर्मचारी हे गुटखा विक्रीला आळा बसविण्यात असमर्थ ठरल्याचे दिसून येत आहे . रामतिर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरसी , लोहगाव , गागलेगाव , बेळकोणी , तळणी , पाचपिपळी , शंकरनगर , डोणगाव , मुगाव , कांडाळा , धानोरा , खतगाव , टाकळी , अटकळी यांसह अनेक गावांत बेधडक गुटखा विक्री होत आहे. तरीही अवैध गुटखा विक्रीबद्दल पोलीस यंत्रणेचे हाताला घडी तोंडावर बोट अशी भुमिका घेत आहे.
विशेष म्हणजे नरसी येथील गुटखा माफीयांवर मागील दोन तीन महीण्यापूर्वी नायगाव व रामतिर्थ पोलीसांत गुन्हा दाखल झाला होता तरी ही हे गुटखा माफीयांनी पुन्हा आपला धदा राजरोसपणे सुरु केल्याचे दिसुन येते .लॉकडावुनच्या काळात नरसी नायगाव परिसरात अवैध गुटखा,अवैध देशी व विदेशी दारू विक्री सह अवैध धंदे बंद झाल्याचे दिसुन येत होते पण सध्या अवैध धंदै सुरू झाल्याचे दिसत आहे.
नरसी व नायगाव परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून विविध प्रकारच्या गुटख्याचा पुरवठा व विक्री होत आहे. या काळ्या धंद्यात कोण गुंतले आहे याची माहिती पोलिसांकडे असून सुद्धा कारवाई करण्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला सुरुवात