29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडसंचारबंदीत गुटखा व्यापारी जोमात प्रशासन कोमात

संचारबंदीत गुटखा व्यापारी जोमात प्रशासन कोमात

एकमत ऑनलाईन

शिवणी (प्रकाश कालेर्वाड ) : शाळा,मंदिर,दवाखाना सारख्या सार्वजनिक ठिकाण च्या परिसरात गुटखा सहज पणे उपलब्ध होत आहे.कोरोना महामारी रोखण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या अनेक जनजागृती असताना व संचारबंदी असताना हे गुटखा माफिया २४ तासात कधी ही व केंव्हा ही दुकान खोलून गुटखा व अमली पदार्थ विकतात.शनिवार रविवार पूर्ण लॉकडाऊन असून सुद्धा शनिवार रविवार दिवसभर सेटर बंद करून आत मध्ये बसतात व बाहेरून आवाज द्या आतमधून गुटखा घ्या अशी गुटखा ठोक व्यापा-्यां कडून केल्या जात आहे एवढेच नव्हे तर सोशल मीडिया मोबाईल स्टेटस वर लॉकडाऊन मुळे दुकान बंद आहे पण काम चालू आहे आपण ऑर्डर देऊ शकतात असा विचित्र प्रकार चालू आहे तर अशा व्यापा-यावर आपत्ती प्रतिबंधक कायदा नुसार गुटखा व्यापारांवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे

सध्या राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा कडक लॉकडाऊन लागेल की काय? अशा चर्चा सोशल मीडियावर होत असताना शिवणी येथील गुटखा व अवैधरित्या धंदे करणा-्यांचे भोवाळ्या उंचावले आहेत.ह्याचे कारण किनवट तालुक्यातील शिवणी हे मोठे बाजार पेठ मानले जाते.आणि या बाजार पेठेला परिसरातील वाड्या-तांड्यासह सीमेलगत असलेल्या तेलंगाणा राज्यातील काही खेड्या-पाड्यातील दुकानदार व्यापारी ही येत असतात.करिता शिवणी येथील गुटखा माफियांनी टोळी गुटखा स्टाक करण्यात व्यस्थ आहे.कारण मागील लॉकडाऊन अचानक २२ मार्च ला लागले होते.त्या नंतर हळू हळू दुकाने खोलण्यास सूट दिली तर कोरोना पार्ट २ च्या २०२१ मधील मागील काही दिवसांपासून लॉकडाऊन लागले होते.आता परत पुन्हा कडक लॉकडाऊन लागते की काय ? आशा उद्देशाने शिवणी येथील गुटखा व्यापारांकडून लाखो रुपयांची गुटखा व अमली पदार्थ साठवून ठेवण्यात आले अशी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

तर शिवणी परिसरात गुटखा विक्रीला उत आला आहे.एवढंच नव्हे तर काही गुटखा विक्रेते होलसेल बनले असून शिवणी परिसरातील खेड्या-पाड्यातील दुकानदारांना घरपोच गुटखा पुरवण्याचे काम सुरू केले आहेत.ह्याचे परिणाम परिसरातील लहान-लहान मुलं-मुली सहज पणे गुटखा खाण्यास शिकत आहेत.महाराष्ट्र सरकारने गुटखा विक्रीकर बंदी आणली मात्र ही बंदी कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस आणि अन्न प्रशासन विभागाच्या आशिवार्दाने या परिसरात सर्रास पणे गुटखा विक्री सुरु आहे.शिवणी येथील काही किराणा दुकानदार गुटखा होलसेल दारात विकत असल्याची माहिती समोर येत आहे. तर आता सध्याच्या संचारबंदीत गुटखा माफिया ची टोळी सोशल मीडिया चा वापर करत गुटखा विकत आहेत.विशेष म्हणजे भरदिवसा दुचाकीवर गुटख्याचे पोते ठेवून बिनधास्तपणे लागेल त्याला माल पुरवला जात आहे.अशाने काही दुकानदार सार्वजनिक ठिकाणी शाळा,अंगणवाडी,मंदिर,मस्जिद, दवाखाना सारख्या ठिकाण च्या परिसरात सहज पणे गुटखा उपलब्ध होत आहे.

शिवणी येथील काही किराणा दुकानदार गुटखा व अमली पदार्थ विक्री करत असून संबधीत खात्याला भ्रष्ट अधिका-्यांसी गुटखा विक्रेतांचे आर्थिक हित संबध असल्याने कार्यवाही होण्याची चिंताच नाही.त्या मुळे गुटखा विक्रेते दिवस-रात्र गुटखा विक्री करत आहे.मोठया दुकानातून ही परराज्यातून येणा-्या अनेक ब्रॅण्ड च्या गुटखा व अमली पदार्थांची खुले-आम विक्री होत असून अन्न व औषध प्रशासनाने या बाबत डोळे झाक करण्याची भूमिका घेत आहे.राज्यातील ठाकरे सरकारने गुटखा बंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्री वा साठेबाजीत सहभागी असणा-्या आरोपीवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला.या बाबत चा कायदा इतका कडक होऊन ही त्याची अंमलबजावणी मात्र संबधीत यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही.त्या मुळे या सर्वच प्रकारात मिली भगत असल्याचे खुले आम आरोप जनतेतून होत आहे.

तो अपहरणकर्ता जेरबंद; देगलूर पोलिसांची कारवाई चाळीस तासात अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या