24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडहिमायतनगरात तब्बल १६ लाखाचा गुटखा जप्त

हिमायतनगरात तब्बल १६ लाखाचा गुटखा जप्त

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर: अवैध धंद्याविरूद्ध कारवाई न करणा-या स्थानिक पोलीसांना चपराक देत एलसीबीच्या शोध पथकाने आयचर टेम्पोमधून जाणारा अंदाजित १६ लाख रुपयाचा गुटखा धाड मारून जप्त केला.ही कारवाई हिमायतनगर ते सवणा रेल्वे अंडर ब्रीजजवळ दि.१८ ऑक्टोंबर रोजी दुपारी करण्यात आली.

कोरोना काळापासून हिमायतनगर शहरातील अनेक व्यवसायिकांना बुरे दिनचा सामना करण्याची वेळ आलेली असली तरी गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अवैध व्यवसाय करणा-या व्यावसायिकांना मात्र कधी नव्हे असे अच्छे दिन तालुक्यात बघायला मिळाले आहे लॉकडाउनच्या काळापासून शहरात चोरट्या मार्गाने गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री होत आहे.याबाबतची माहिती हिमायतनगर येथील स्थानिक पोलिस व अन्न औषध प्रशासनास माहित असून सुद्धा त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची कार्यवाही केली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील चौपाटी, बाजार चौक, व उमर चौक परिसरात गुटख्याची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे.

सोमवारी दि.१८ रोजी हिमायतनगर वरून सवणा जाणा-या रोड वरून अवैध गुटखा घेऊन जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अधिका-यांना मिळताच त्यांनी या माहितीच्या आधारावर पथकातील अधिका-यांनी एका आयचर गाडीत असलेल्या अंदाजे १५ लाख ८० हजारांच्या गुटख्यावर छापा टाकून कार्यवाही केली यामध्ये विमल व नजर अशा विविध उत्पादन कंपण्याचा गुटखा असल्याचे पोलिसान कडून सांगण्यात आले. याप्रकरणी हिमायतनगर पोलीस स्थानकात आरोपी विरुद्ध कलम २६(२)२७ अन्न सुरक्षा मा. न. के.२००६, स.क.२०११ स.क.३०(2) अ ५९(आय बि.) व कलम १८८,२७२,२७३,२२८ प्रमाणे भा.द.वी.गुन्हा दाखल करण्यात आला व ह्या घटनेचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सचिन सोनवणे, पि. टी.चव्हाण पोलीस उप निरीक्षक हे करीत आहेत

चौपाटी परिसर गुटखा विक्रीचे केंद्र
शहरातील चौपाटी ,बाजार चौक परिसरात गुटखा माफियांचे अड्डे लॉकडाउनच्या काळापासून राजरोस पने सुरूच आहेत आणि आजही दिवसाढवळ्या गुटख्याची विक्री सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असल्याने वाहतूक व विक्री ही चोरट्या मागार्नेच होते.

हिमायतनगर शहरालगत असलेल्या अनेक भागात गुटख्याचा साठा करण्याची ठिकाणे आहेत. काही व्यापारी तर गुटख्याची ग्राहकांना घरपोच सेवा देत आहेत.तरी पण पोलीस प्रशासन मूग गिळून गप्प का बसले आहे, असा आरोप शहरातील सुजाण नागरिक विचारात आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिका-यांनी याकडे लक्ष देऊन अवैध गुटखा विक्री करणा-यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या