30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home नांदेड पावणेपाच लाखांचा गुटखा जप्त

पावणेपाच लाखांचा गुटखा जप्त

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्य शासनाकडून गुटखा उत्पादन , विक्री व साठवणुकीवर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे मात्र अनेक गुटखामाफिया अजूनही गुटख्याची चोरीच्या मार्गाने विक्री करीत आहेत. जिल्हा पोलिस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना दिलेल्या सूचनेवरुन जांब बु. येथे पोलिसांनी धाड टाकुन ४ लाख ७६ हजार ५०० रूपयांचा गुटखा जप्त केला ही कारवाई १८ फेब्रुवारी रोजी करण्यात आली.

राज्यभरात राज्य शासनाकडून गुटखा उत्पादन, साठवणूक व विक्रीवर पूर्णता बंदी घालण्यात आली आहे. परंतु अनेक गुटखामाफिया शेजारच्या आंध्र प्रदेश, तेलंगना या राज्यातून नांदेड जिल्ह्यात गुटखा आणून विक्री करीत आहेत. नांदेड शहरासह ग्रामीण भागातही गुटख्याचा अवैधरित्या साठा कला जात आहे. जांब बु. येथे राऊतखेड कॉम्प्लेक्समध्ये एका बेकरीच्या दुकानात विनापरवाना सुगंधी तंबाखु , पाणमसाला, गुटखा , सुपारीची साठवणूक करून विक्री करीत असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक शेवाळे यांना मिळाली.

याबाबत शेवाळे यांनी पोलिसांना कारवाईची सूचना केली. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिग़ोबाडे व त्यांच्या सहका-यांनी जांब येथे जावून १८ फेब्रु रोजी छापा टाकला. यात शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा, पाण मसाला, सुगंधी तंबाखु , सुपारीची चोरटी साठवणूक करून विक्री करत असल्याचे मिळून आले. पोलिसांनी या दुकानातून जवळपास ४ लाख ७६ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मुखेड पोलिस ठाण्यात विलास गोबाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून जवळपास पावनेपाच लाखांचा गुटखा जप्त केला आहे. या घटनेमुळे गुटखा माफियांची धाबे दणाणले असून चारीच्या मार्गाने गुटखा विक्री करणारे याविषयी चवीने चर्चा करीत आहेत.

ग्रीनकार्डच्या संख्येवरील मर्यादा अमेरिका काढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या