35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home नांदेड हदगाव नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा

हदगाव नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा

एकमत ऑनलाईन

हदगाव : गेली दहा महिन्यापासून हदगाव नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगराच्या विकासाची कामे रखडलेली आहेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. या पूर्वीचे मुख्याधिकारी महेश गायकवाड यांची बदली झाल्यानंतर तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी विजय येरावाड यांच्याकडे हदगाव नगरपरिषेचे प्रभारी मुख्याधिकारी पद सोपविण्यात आले आहे परंतु शहरातील लोकसंख्या व तहसील कार्यालयात पुरवठा विभागात अंतर्गत येणारी लोकसंख्या यांचा विचार करता प्रभारीमुख्याधिकारी यांचा कारभार एक ना धड भाराभर चिंध्या झाला आहे.

त्यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील व तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे.त्यांनी आपल्याच जवळच्या माणसांना व सर्व नगरसेवकांना गुत्तेदारी दिल्यामुळे व तसेच तालुक्यातील राजकीय पुढाऱ्यांच्या बरोबर जवळीकता वाढल्याने त्यांच्या स्वतःच्या कामात अडकून त्यांना हदगाव शहरवासीयांना व तालुक्यातील राशनकार्ड धारकांना वेळ देने शक्य होत नसल्याने शहरातील व तालुक्यातील जनता त्यांच्या कारभारावर वैतागून गेली आहे.आतापर्यंत त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे ही टक्केवारीच्या भानगडीत अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहेत. झालेल्या सर्व कामाची चौकशी करावी अशी मागणी शहरवासीयांतुन होत आहे.

दुसरीकडे विजय येरावाडा तहसील कार्यालयात पुरवठा अधिकारी असल्याने राशनकार्डच्या अनेक फाईल कार्यालयात धूळखात पडून आहेत.कार्यालयात पुरवठा अधिकारी सदा गैरहजर असल्याने नवीन राशनकार्ड तयार करणे राशनकार्डतील नाव कमी करणे व वाढविणे अश्या राशनकार्ड धारकांना तहसील कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहेत एकंदरीत मुख्याधिकारी व पुरवठा अधिकारी एकच असल्याने जनतेची हेडसाड होत आहे.मुख्याधिकारी कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याने शहरात आरोग्याच्या समस्याने व कचरा.नाली सांडपाणी यांनी उग्ररुप धारण केले आहे.प्रभारी मुख्याधिकारी यांचा कार्यालयाच्या कामकाजातील ढिसाळपणा. नियोजनशून्य.मनमानी कारभार शहराच्या विकासासाठी शासकीय योजना राबिवण्याची कुवत नसल्याने नगरपरिषद कडून शहरवासीयांनचा होणारा विकास खुंटला आहे.म्हणून हदगाव नगरपालिकेच्या रखडलेल्या योजना व शहरवासीयांनच्या सर्वांगीण विकासासाठी कायमस्वरूपी व अनुभवी कार्यक्षम मुख्याधिकारी देण्याची मागणी हदगाव शहरवाशी यांनी केली आहे.

अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या