22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeनांदेडहदगावच्या पंचायत समितीला सक्षम गटविकास अधिकारी नसल्यामुळे बोगस कामांचा सुळसुळाट

हदगावच्या पंचायत समितीला सक्षम गटविकास अधिकारी नसल्यामुळे बोगस कामांचा सुळसुळाट

एकमत ऑनलाईन

प्रतिनिधी – सध्या हदगाव तालुक्यात विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत परंतु होत असलेले कामे हे अतिशय निकृष्ट दर्जाचे व बोगस रित्या केल्या जात असल्याचे कारण म्हणजे हदगावच्या पंचायत समितीला सक्षम गटविकास अधिकारी नसल्यामुळे बोगस कामाचा सुळसुळाट झाला असल्याचे पाहावयास मिळत आहे तरी देखील यावर वरिष्ठ अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत आहेत की काय असा प्रश्न तालुक्यातील विकास प्रेमी नागरिकांतून होत आहे

तसेच कोणतेही विकासकामे करून घ्यायचे असेल तर टक्केवारी द्या अन्न ..बोगस कामाचे देयक घ्या असा हदगाव च्या गटविकास अधिकाऱ्यांनी नवीन फार्मूला अमलात आणल्यामुळे गुत्तेदारचे व ग्रामसेवकाचे चांगभलं होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे खेड्यापाड्यातील विकासकामांना खेळ तर बसतच आहे पण निकृष्ट बोगस कामे केली जात असल्याने त्या कामाची तक्रार तरी कोणाकडे करावी असाही प्रश्न समोर येत आहे कारण यावर नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तालुक्‍याच्या लोकप्रतिनिधींना देखील वेळच मिळत नाही त्यामुळे गुत्तेदारसह गटविकास अधिकार्‍याचे मनोबल अधिकच वाढत चाललेले असल्याचे यावरून तरी दिसून येत आहे

विशेष म्हणजे हदगाव तालुक्यातील जनतेच्या मनामध्ये हे गटविकास अधिकारी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून जनता त्यांना मानत होती परंतु हेही गटविकास अधिकारी यापूर्वी बदलून गेलेल्या गटविकास अधिकाऱ्याचा मागचा पाढा वाचत आहेत त्यामुळे हदगाव पंचायत समितीला चांगला व कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी मिळेल का असा प्रश्न उपस्थित होत असून हदगावच्या पंचायत समितीमध्ये सध्या भोंगळ कारभार चालू असल्याचे पाहावयास मिळत आहे याशिवाय हदगावचे गट विकास अधिकारी हे तालुक्यातील कोणत्याही गावात जाऊन कोणत्याही कामाची पाहणी करीत नाहीत ते फक्त खुर्चीवर बसून तालुक्यातील विकास कामाचा आढावा घेत आहेत याचे कारण म्हणजे टक्केवारी द्या अन्न कोणते ही बोगस कामाचे देयक घ्या हेच आहे त्यांच्या कर्तव्यावरून तरी दिसून येत आहे तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर विशेष लक्ष देऊन येथील गटविकास अधिकाऱ्यांची तात्काळ बदली करून त्या ठिकाणी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी तालुक्यातील जनतेकडून होत आहे.

बंद असलेली मंदिरे उघडण्या साठी कंधार मध्ये भाजपाचे लक्षणिक उपोषण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या