30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडहदगावकरांचा आनंद ठरला क्षणभंगूर; १ पॉझिटिव्ह

हदगावकरांचा आनंद ठरला क्षणभंगूर; १ पॉझिटिव्ह

एकमत ऑनलाईन

हदगाव : कालच हदगांव तालुका कोरना मुक्त झाल्याचा आनंद तालुक्यातील लोकांनी व्यक्त केला असता आज परत तालुक्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने हा आनंद फार काळ टिकणार नसल्याचे आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे.म्हणून हदगावकरांचा आनंद क्षणभंगुर ठरला आहे आतातालुक्यात रुग्णाची संख्या पाच झाली आहे त्या पैकी तिघांना सुट्टी झाली आहे उर्वरित दोघांवर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चागल्या प्रकारे आहे अशी माहिती समोर आली आहे.

हदगांव तालुक्यात शेवटच्या टोकावर पण यवतमाळ जिल्ह्याला लागून असलेल्या सीमेवरील पेवा या गावात एक कोरोना बाधित महिला आढळून आली असून दुसरा रुग्ण हा उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ढगे यांनी सांगितले. तपासणीसाठी आलेल्या रुग्णांची लाळ नमुने घेण्याचे काम तो करत असे. असेच नमुना घेताना तो बाधित झाला असावा असा तर्क व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय दुसरा बाधित रुग्ण पेवा या गावातील महिला असून ती महीला भोकर येथील नातेवाईक असलेल्या कोरूनामुळे मृत्यू झालेल्या एका महिला नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी भोकर येथे गेली होती.

परंतु त्या महिलेच्या प्रेताची नांदेड येथेच विल्हेवाट लावली. त्यामुळे अंत्यविधीला ही महिला उपस्थित राहिली नसली तरीही ती मृत्यू पावलेली महिला ज्या घरात ज्या ठिकाणी राहत होती त्या घरांमध्ये आज बाधित निघालेली पेवा येथील महिला दोन दिवस थांबली होती. त्यामुळे व इतर नातेवाईकांच्या संपर्कात आल्यामुळे ही महिला बाधित झाली असावी असा कयास लावला जात आहे. त्यानंतर आरोग्य पथकाच्या सूचनेवरून या कुटुंबातील सर्व सदस्यांना गावातील शाळेमध्ये संस्थात्मक विलगीकरण यात ठेवण्यात आले होते.

काल आरोग्य विभागाचे कर्मचारी पेवा या गावांमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कार्यक्रमांतर्गत तपासणीसाठी गेले होते. त्यांनी संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या या महिलेच्या आरोग्याची चौकशी केली. दरम्यान या महीलेची प्रकृती ठीक नसल्याचे आढळून आल्यामुळे त्या पथकाने तालुका आरोग्य अधिकार्‍याकडे लाळ नमुने घेण्याची सूचना केली. त्यावरून नमुने घेतले असता आज त्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

लाळ नमुने घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या निदेर्शानुसार प्रमाणीत पीपीई कीट आवश्यक असतांना अत्यंत तकलादू अर्धवट शरीर ऊघडे राहणाºया पीपीई कीट वापरात येत असून संशयित रुग्ण व आरोग्य कर्मचारी याच्यात संरक्षक आवरण किंवा पडदा असावा अशीही शिफारस जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. हदगांवच नव्हे तर जिल्ह्यातील कुठल्याही रुग्णालयात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सुचनांची अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप कांहीं दिवसांपूर्वी डॉक्टरांच्या एका संघटनेने केला होता.

योग्य ग्ल्वोव्हज, तिहेरी मास्क, फेससिल्ड मास्क, रुग्ण व कर्मचारी याच्यामध्ये संरक्षक भिंत ईत्यादी सर्व सुविधा प्रशासनाने ऊपलब्ध करून दिल्या तरच अशा घटना न घडता आरोग्य कर्मचारी व त्यांचे कुटूंबीय सुरक्षित राहू शकतील.

Read More  कोरोनाचा उद्रेक कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या