29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडदेगलुरात वाळू माफियांचा हैदोस

देगलुरात वाळू माफियांचा हैदोस

एकमत ऑनलाईन

देगलूर: एकीकडे कोरोनाने हाहाकार माजविला आहे परिणामी संपूर्ण समाज कोरोनाच्या दहशतीखाली वावरत आहेत अशा गंभीर परिस्थितीमध्ये ही वाळू माफिया दिवसरात्र शहर व परिसरात अवैध वाळूच्या उपसा व वाहतुकीने हैदोस घातला आहे. यावर अंकुश ठेवणारी यंत्रणा मुग गिळून गप्प बसल्याचे दिसून येत आहे. तालुक्यातील वाळू घाटाची लिलाव प्रक्रिया लाल फितीत अडकल्याने वाळू माफियांना सोन्याचे दिवस आले आहेत. बिलोली तालुक्यातील हुनगुंदा या वाळू घाटावरून नाममात्र रॉयल्टी ची पावती आणून दुप्पट-तिप्पट ब्रास रेतीची अवैध वाहतूक केली जात आहे तसेच सीमेपलीकडील धोती खतगाव , शिरपूर , उमर सांगवीच्या बाजू लगत असलेल्या तेलंगणातील वाळू घाटावरून वीस हजार रुपयेला आठ ब्रास ची गाडी झिरो मध्ये भरून दिली जात आहे.

या अवैध भरलेला टिप्पर देगलूर शहरात बिनदिक्कतपणे ५० हजार रुपये या दरात खाली केले जात आहे. विशेष म्हणजे या अवैद्य भरलेल्या वाळूच्या टिप्परला ना महसूल अडवते ना पोलीस.यामुळे तेरी भी चूप मेरी भी चुप असे गांधारीची भूमिका निभावत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी दिवसेंदिवस जसे कोराना संसर्ग आपले हातपाय पसरवित आहे त्याचप्रमाणे या निर्ढावलेल्या अवैध वाळू माफियांनी शहर व परिसरात दिवसा व रात्र पाळीमध्ये हैदोस घातला आहे. कारवाईच होत नसल्याने वाळू माफियांची तक्रार तरी कोणाकडे करावे असा प्रश्न सुज्ञ नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. आता या गंभीर बाबीकडे विभागीय आयुक्तांनी दखल घ्यावी अशी मागणी होत आहे.

लाल रेतीचा भाव सोन्याच्या दरात मोडत असल्याने सर्वसामान्यांना हा दर परवडणारा नाही .त्यामुळे छोटे-मोठे घर बांधकाम करणारे घर मालक काळ्‍या रेतीकडे आपला मोर्चा वळविल्याने या काळ्‍या वाळूलाही चांगले दिवस आले आहेत .हे सुवर्ण संधी साधून शहरालगत असलेल्या देगाव ,बळेगाव, अचेगाव , मलकापूर बागवान टाकळी या गावच्या नदीपात्रातून ट्रॅक्टर द्वारे अवैद्य रेतीचा उपसा केला जात आहे त्यामुळे या नदीपात्रात मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत परिणामी पर्यावरणाचा -हास होत आहे. या काळ्‍या वाळूचा अवैध धंदा एकदम जोमात चालू आहे . त्यामुळेच ट्रॅक्टर चालकाची एवढी मुजोरगिरी वाढली असून भरदिवसा देगाव रोड , भायेगाव रोड , या मागार्ने व नवीन पूला जवळून शहरातील अनेक बांधकाम व्यवसायिकांना काळी वाळू पुरविली जात आहे.

संचारबंदीत कुटुंबांना मिळणार मोफत अन्नधान्याचा लाभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या