18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्‍हयात हात धुवा दिवस साजरा होणार

नांदेड जिल्‍हयात हात धुवा दिवस साजरा होणार

एकमत ऑनलाईन

नांदेड : स्‍वच्‍छ भारत मिशन अभियानांतर्गत स्‍वच्‍छतेविषयी जाणीवा समृध्‍द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जिवनासाठी जागतिकस्‍तरावर दिनांक १५ ऑक्‍टोबर हा दिवस दरवर्षी हातधुवा दिन म्‍हणून साजरा केला जातो. त्‍याअनुषंगाने जिल्‍हयातील सर्व ग्राम पंचायतीमधून जागतिक हातधुवा दिन साजरा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दिली आहे.

हातधुवा दिनाच्‍या संकल्‍पनेला धरुन अन्‍न स्‍वच्‍छता, हातधुण्‍याच्‍या महत्‍वाच्‍या वेळा विशेषत: स्‍वयंपाक करण्‍यापूर्वी, स्‍वयंपाक झाल्‍यावर, शौचाहून आल्‍यावर, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्‍यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्‍यानंतर, झाडझुड केल्‍यानंतर, पाळीव प्राणीमात्रांना स्‍पर्श केल्‍यानंतर, आजारी व्‍यक्‍तीच्‍या भेटी पूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्‍यानंतर साबणाने हात धुणे आवश्‍यक आहे. या संदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्‍यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात येणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्‍यासाठी नियमित हात साबणाने स्‍वच्‍छ धुणे आवश्‍यक आहे.

गावस्‍तरावर गट विकास अधिकारी, बाल विकास प्रकल्‍प अधिकारी, शिक्षणाधिकारी, तालुका आरोग्‍य अधिकारी, वैद्यकिय अधिकारी, विस्‍तार अधिकारी, ग्राम विकास अधिकारी, ग्रामसेवक, अंगणवाडी पर्यवेक्षीका, आरोग्‍य सेवक, आरोग्‍य कर्मचारी यांच्‍या पुढाकारातून जागतिक हात धुवा दिवस साजरा केला जाणार आहे. यासाठी महिला बचतगट, शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, स्‍वच्‍छागृही, माविमच्‍या संयोगिनी, युवक-युवती, नेहरु युवा केंद्र, स्‍वयंसेवी संस्‍था आदींनी सहभागी होऊन हा दिवस साजरा करायचा आहे.

विद्यार्थ्यांच्या मदतीने रॅली काढण्यात येऊन लोकांकडून साबण भेट म्हणून गोळा करण्यात यावेत. रॅलीमध्ये गावात साबणाने हात धुण्‍या बाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, शाळा स्तरावर रांगोळी, वक्तृत्व, चित्रकला, पोस्टर तयार करणे अशा विविध स्पधेर्चे आयोजन करण्‍याच्‍या राज्‍य शासनाच्‍या सूचना आहेत. त्‍यानुसर गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकरी यांनी नियोजन करण्‍याचे निर्देश मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिले आहेत. सदरील उपक्रम कावीडच्या पार्श्वभूमीवर निर्गमित केलेल्या सर्व सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे,असेही ठाकुर यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या