26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeनांदेडश्रध्दाच्या मारेक-यास फासावर लटकवा

श्रध्दाच्या मारेक-यास फासावर लटकवा

एकमत ऑनलाईन

कंधार : श्रद्धा वालकर या तरुणीची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करणा-यास नरधाम अफताबला फासावर लटकवावे, राज्यात लव्ह जिहाद व धर्मांतर बंदी कायदा अंमलात आणावा, रोडरोमियोचा तात्काळ बंदोबस्त करा अशी मागणी दि. २१ नोव्हेंबर रोजी विश्व हिंदू परिषद व सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी तहसिलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस परिसरात शहरातील तसेच ग्रामीण भागातील शिक्षणासाठी येणा-या विद्यार्थिनींची छेड काढल्या जात आहे. अशांचा बंदोबस्त करावा व कंधार शहरातील मुख्य रस्त्याने रोड रोमिओ, टुकार मुले आपली वाहने, मोटारसायकल सुसाट वेगाने पळवतात, हॉर्न मारतात, पोलिस सायरन वाजवतात, बुलेट गाडीचे सायलेन्सर काढून फटाके वाजवणे, ट्रिपल सीट बसवून फिरणे, विना कागदपत्रे असलेली चोरीची वाहने चालवणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने बाजारपेठेत जाणा-या महिला व शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास होत असून, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशी प्रकरणे थांबवायच्या दृष्टीने तालुक्यातील महिला, मुली, विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दामिनी पथककिंवा चिडीमार पथक स्थापन करून रोड रोमिओ चा बंदोबस्त करावा अशी मागणी विश्व हिंदू परिषद व कंधार वासीयांच्या वतीने निवेदनाद्वारे केली. असेच प्रकार चालू राहिल्यास हिंदुत्ववादी संघटनेच्यावतीने समाजविघातक तरुणांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा प्रशासनास देण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या