नांदेड : एका २७ वर्षीय विवाहितेच्या चारिर्त्यावर संशय घेवून, मारहाण करीत माहेरहून दोन लाख रूपये घेवून येण्याच्या मागणीसाठी छळ केल्याची घटना रवीनगर कौठा येथे घडली. या प्रकरणी सासरच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २७ वर्षीय विवाहितेचा मागच्या चार वर्षापासून तिचे सासरच्या विविध कारणावरून तिचा छळ करीत आहेत. सदर विवाहितेच्या चारिर्त्यावर संशय घेवून तिला शिवीगाळ करीत अपमानीत करणे,उपाशी पोटी ठेवणे असे करून शारीरिक व मानसीक त्रास देत आहेत. तसेच पैशाची मागणी करत माहेरहुन दोन लाख रूपये घेवून ये असा तगादा लावत आहेत. या सतत होणा-या त्रासाला कंटाळून सदर विवाहितेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, त्या तक्रारीवरून आठ जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोहेकॉ पांढरे करीत आहेत.