लोहा : अथक परिश्रम जिद्द,कुटुंबाची प्रेरणा व आशीर्वाद असेल तर नक्कीच यशोशिखर गाठता येत असल्याचे मत अमोल चव्हाण यांनी व्यक्त केले. लोहा येथील उच्चशिक्षित युवक, सामाजिक कार्यकर्ते अमोल बालाजी चव्हाण ज्यांना ‘एबीसी’ या टोपण नावाने ओळखले जाते. नुकतीच ते जालना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे वर्ग-१ अधिकारी म्हणून रूजू झाले. त्यानंतर त्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.
घरात लहानपणापासून शैक्षणिक वातावरण . तत्पूर्वी चव्हाण घराणे हे सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले घराणे म्हणून ओळखले जाते. आजोबा कै.यशवंतराव चव्हाण यांच्यासह पुर्ण चव्हाण कुटुंबीयांनी सर्व क्षेत्रात गरूडझेप घेतली. परंतु मातृ छत्र हरवलेल्या अमोल व सुजित या भावंडांना चव्हाण व आजोळ असलेल्या श्ािंदे कुटुंबीयांनी आई कावेरीताईंची उणीव भासू दिली नाही. तसेच वडील असलेले मुख्याध्यापक बी.वाय.चव्हाण यांनी प्राथमिक ते उच्च शिक्षणाबरोबरच लोहा, नांदेड, पुणे,दिल्ली येथील मुलांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा करून शाबासकीची थाप देत राहिले.
शिक्षण घेत असताना वा कोणतेही कार्य करत असताना अथक परिश्रम, जिद्द, कुटुंबाची प्रेरणा व आशीर्वाद असेल तर नक्कीच यशोशिखर गाठता येत असल्याची प्रतिक्रिया जालना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे नुतन सहाय्यक व्यवस्थापक अमोल बालाजीराव चव्हाण यांनी दिली. मोठे बंधू सुजित कावेरीताई बालाजी चव्हाण तर धाकटे बंधू अमोल कावेरीताई बालाजी चव्हाण यांना अनुक्रमे किनवट व जालना येथे कामावर रूजू झाल्यानंतर त्यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.