34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeनांदेडकोरोनामुळे कंधार येथील हजरत हाजी सय्याह उरूस रद्द

कोरोनामुळे कंधार येथील हजरत हाजी सय्याह उरूस रद्द

एकमत ऑनलाईन

कंधार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कंधार येथील प्रसिद्ध सुफीसंत हजरत हाजी सय्याह सरवरे मगदूम रहमतुल्लाअलै यांचा उरूस रद्द करण्यात आल्याची माहिती दगार्चे सज्जादा सय्यद शाह मूतुर्जा हुसैनी रफाई आणि मुतवल्ली सय्यद शाह मुजतबा हुसैनी रफाई यांनी दिली. राष्ट्रीय एकतेचा प्रतीक असलेला कंधार येथील हजरत हाजी सय्याह यांचा यावर्षी ७०५ वा उरूस आहे. दरवर्षी रजबच्या १६ तारखेला हा उरूस असतो.

उरुसा निमीत्त चार दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यात संदल मिरवणूक, कुस्त्या, कव्वाली, हास्य कविसंमेलन, महाप्रसाद आदींचा समावेश असतो. रजबची १६ तारीख सोमवारी आहे. परंतू कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उरुसचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. उर्स निमित्ताने मोठ्या संख्येने गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या कोरोना साथरोग आजारामुळे आरोग्यविषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच माननीय जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेश क्र. २०२१ /मशाका/आव्य/कावी दिनांक 20 2 2021 रोजी व तसेच तालुका दंडाधिकारी कंधार यांचा आदेश क्रमांक २० २१ एम जी ए सि आर तसेच या विषया मुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाचे नियंत्रणास्तव कोणतेही दुकान प्रभात फेरी बाईक रॅली मिरवणूका काढण्यात येऊ नये.

दर्गा महोत्सव परिसरात तसेच उर्स भरण्याच्या परिसरात कोणीही दुकाने आनंद नगरी हॉटेल फेरवाले इत्यादी साठी व तत्सम प्रकारची गर्दी करू नये असे आव्हान सय्यद शाह मुतुर्जा मोइयोद्दीन यांनी केले यावेळी सय्यद शहा मुजताबा मोइयोद्दिन मुत्वली, शेख समीर शेख मोइयोद्दिन, एजास पटेल, मगदुम परदेशी, अर्शद कुरेशी आदींची उपस्थिती होती. देशासह राज्य आणि जिल्ह्यात कोरोनाच्या दुस-्या लाटेत रुग्णात वाढ होत असल्याने प्रशासनाने सर्व धार्मिक कार्यक्रमावर प्रतिबंध आणले आहेत.

भारतातील टॉप पाच भिका-यांची संपत्ती ऐकून व्हाल थक्क

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या