बिलोली : ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत तब्बल १५ कर्मचा-यांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे आरोग्य केंद्रच आजारी पडण्याची वेळ आली आहे.
बिलोली तालुक्यातील लोहगाव प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत २१ गाव असून ४१ हजार एवढी लोकसंख्या आहेÞ या केंद्रांत ६ उपकेंद्र येत येतात. येथे काम करण्यासाठी ३२ कर्मचा-यांची आवश्यकता पंरतु १७ कर्मचा-यांची नियुक्ती झाली मात्र अजूनही तब्बल १५ कर्मचा-यांच्या जागा रिक्त आहेत. यामध्ये ३ आरोग्य सेवक, ३ आरोग्य सेविका, ३ कंत्राटी आरोग्य सेविका, १ आरोग्य साहीका, १ आरोग्य कंत्राटी सहसाहीका, १ लॅब असीस्टंट, ३ सेवक पदांचा समावेश आहेÞ
शासन म्हणतो दिलेले उदिष्टे पुर्ण करा मात्र अपु-या कर्मचारी बळावर काम कसे करावे, असा प्रश्न निर्माण होत आहेÞ तर उदिष्टे अपुरे राहिल्यामुळे तालुक्यातील ३ आरोग्य सेविकेला कार्यमुक्त करण्यात आले. हा एक प्रकारे अन्यायच असल्याचे एका कर्मचा-यांने सांगितले. कर्मचा-यांची गैरसोय आणि रुग्णांची होणारी उपचारासाठी होणारी हेळसांड लक्षात घेऊन सिईओ वर्षा ठाकूर यांनी आरोग्य केंद्रातील काही पदे तातडीने भरावीत अशी मागणी होत आहे.