26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडगडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी

गडगडाटासह जोरदार पावसाची हजेरी

एकमत ऑनलाईन

नांदेड : हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानूसार गुरूवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह शहर परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली़ सकाळपर्यंत उन्ह कायम होते, मात्र दुपारी एकच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली होती़

ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी झाल्यानंतर पावसाचा जोर काहिसा कमी झाला होता. दि़ १५ ऑगस्ट रोजी पहाटेपासूनच पावसाचे आगमन झाले. दिवसभर संततधार पाऊस सुरु होता. यानंतर पावसाने उघडीप दिली. दोन, चार दिवसानंतर पाऊस पुन्हा होईल असे वाटत होते. परंतु, वीस दिवसांपासून पाऊस गायब झाला. लांबलेल्या पावसामुळे वातावरणात चांगलाच बदल जाणवत होता. दिवसभर तळपते न आणि रात्रीच्या वेळी उकाडयाने नागरिक हैराण झाले होते. तोच शनिवारी मध्यरात्री व रविवारी पहाटे पावसाने हजेरी लावून थोडासा दिलासा दिला़ यानंतर सोमवार दि़ ५ पासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे..

भारतीय हवामान विभागाने गुरूवार दि़ ८ सप्टेंबरपासून पावसाचा जोर वाढेल आणि दि़ ९ रोजी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तविला होता़ हा अंदाज कधी नव्हे तो खरा ठरला आहे़ गुरूवारी सकाळपर्यत कडक उन्ह होते़ मात्र दुपारी एकच्या सुमारास आभाळ भरून आले आणि ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली़ शहर परिसरात जवळपास दोन तास मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच होता़ अचानक आलेल्या पावसाने बाजारपेठसह मुख्य रस्त्यावरील नागरिकांची तारांबळ उडाली़ तर सखल भागासह शहरातील अनेक मुख्य रस्त्यावर पाणी साचले होते.

ऑगस्ट महिन्यात नांदेड जिल्ह्यातील बहुतांशी भागात अतिवृष्टी होऊन पुर परिस्थिती निर्माण झाली होती़ यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले़ या पिकांचे पंचनामे पुर्ण झाले परंतू शेतक-यांना शासनाकडून अजून मदत मिळाली नाही़ त्यात गेल्या वीस दिवसापासून पावसाने दडी मारली़ यामुळे उरली, सुरली पिके माना टाकत होती़ तेव्हा शनिवारी रात्री जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या