23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeनांदेडअतिवृष्टीने ५ लाख ९३ हजार ११७ शेतक-यांना फटका

अतिवृष्टीने ५ लाख ९३ हजार ११७ शेतक-यांना फटका

एकमत ऑनलाईन

नांदेड : अतिवृष्टी आणि ढगफुटीसारखा पाऊस होऊन जुलै महिन्यात नांदेड जिल्ह्यात तीन लाख ५८ हजार ७३१ हेक्टर क्षेत्रातील खरिपासह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या आपत्तीचा फटका पाच लाख ९३ हजार ११७ शेतक-यांना बसला. या नुकसानग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार जिल्हा प्रशासनाने २४४ कोटी १८ लाख २१ हजार आठशे रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे.

नांदेड जिल्ह्यात मागील काही वर्षाच्या तुलनेत यंदा जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. अनेक भागात अतिवृष्टी आणि ढगफुटी सारखा पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील तब्बल ८० मंडळात अनेकवेळा अतिवृष्टीची नोंद झाली. जुलैमध्ये विक्रमी ६०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या पावसाचे प्रमाण प्रचंड असल्याने नदी, नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली. सखल भागातील पिके पाण्याखाली गेली. यामुळे सात लाख ६३ हजार ६८१ हेक्टर पिकाखालील क्षेत्र असलेल्या जिल्ह्याला फटका बसला. यात जिरायतीमधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तूर, उडीद, मुग या ३ लाख ५८ हजार ३८६ हेक्टरवरील पिकांसह ३१४ हेक्टरवरील बागायती व ३१ हेक्टरवरील फळपिके असे एकूण ३ लाख ५८ हजरी ७३१ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले.

यात अतिवृष्टीचा फटका ५ लाख ९३ हजार ११७ शेतक-यांना बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वच १६ तालुक्यांकडून नुकसानीची आकडेवारी घेतली. यासाठी एनडीआरएफच्या हेक्टरी सहा हजार आठशे रुपये प्रतिहेक्टर मदतीच्या प्रचलित दरानुसार जिल्ह्यासाठी २४४ कोटी १८ लाख २१ हजार आठशे रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या