23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeनांदेडहिमायतनगर शहर परिसरात धुव्वाधार पाऊस

हिमायतनगर शहर परिसरात धुव्वाधार पाऊस

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : शहर परिसरात बुधवारी दुपारपासून धुंवाधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजांचा कडकडात सुरू झालेल्या पावसाच्या पाण्याने शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर घसरगुंडी निर्माण झाली आहे. यामुळे अनेक वाहनधारक घसरून पडावे लागत आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चार महिन्यापासून तळपत्या उन्हामुळे आणि गरमीमुळे नागरिक हैराण झाले होते. मृग नक्षत्राच्या दिवशी रिमझिम पाऊस झाला. त्यांनतर बुधवारी दुपारी ३ वाजता सुरू झालेल्या धुंवाधार मुसळधार पावसामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुरवणे पाऊस झाल्यानंतरच शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार आहे. सध्या बी-बियाणे खरेदीसाठी शेतक-यांची बाजारपेठेत गर्दी दिसून आले आहे. बुधवारी पहिल्याच धुंवाधार पावसाने परिसरातील नदी नाले ओढे वाहू लागले असून, विहिरी, बंद पडलेले बोरला पाणी पातळी वाढण्याची शक्यता वाढली आहे.यामुळे पाणी टंचाईचा सामना करणा-या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

मागील चार वषार्पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराने अर्धवट ठेवल्यामुळे आणि संथगतीने चालू असल्यामुळे नागरिकांना या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे आनंद अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या शहरातून सुरु असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून ठेवण्यात आल्यामुळे या पावसामुळे सर्वत्र चिखलमय परिसर झाला आहे. या रस्त्याने जाताना दुचाकी तर सोडाच चार चाकी वाहनांना सुद्धा मोठ्या जिकरीने रस्ता पार करावा लागत आहे. आणखी जर मोठा पाऊस झाला तर किनवट- हिमायतनगर,भोकर हा महामार्ग बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसाने वडगाव येथील घारगाव येथील नाल्यावरून नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे खैरगाव येथील नाल्याचा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला होता.

त्यामुळे चार तास वाहतूक थांबली होती तसेच सवना येथील पुराचे पाणी वाहू लागल्याने हा मार्गही बंद झाल्याने नागरिकांना घर गाठण्यासाठी ३० किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागला होता. या धुंवाधार पावसामुळे शहर परिसर नाल्यातील घाण थेट रस्त्यावर आली असून, सराफ लाईन, चौपाटी परिसर, उमर चौक ते परमेश्वर मंदिर कमान, लाकडोबा चौक, आंबेडकर चौक, बाजार चौक, बजरंग चौक, यासह इतर ठीक ठिकाणच्या चौकात नाल्याचे दुगंर्धीयुक्त घाण पाणी रस्त्यावर आले होते. या पावसामुळे शहरात दुगंर्धी पसरली होती. याकडे नगरपंचायतीने लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

एनपीएतून सुटका कशी?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या