24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeनांदेडइस्लापूर, शिवणी परिसरात जोरदार पाऊस

इस्लापूर, शिवणी परिसरात जोरदार पाऊस

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर / शिवणी : जलधारा, शिवणी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने परिसरातील वाडी,तांडयातील शेतकरी वर्ग थोडासा समाधानी झाला आहे.पेरणीसाठी बि,बियाणे,खते व पावसाळ्यात लागणारे छत्री,ताडपत्री साहीत्य खरेदी करण्यासाठी वाडी,तांडयातील शेतकयाची ईस्लापुर,शिवणी बाजारपेठेत मोठया प्रमाणावर गर्दी उसळली आहे.

रोहीणी नक्षत्रात अवकाळी पाऊस झाला तर रोहीणी नक्षत्र संपत आले असताना मूग नक्षत्राच्या तोंडावर ढगाळ वातावरण होवुन मूग नक्षत्राच्या तोंडावर दि ४ जुन शुक्रवार रोजी सकाळी ईस्लापुर,जलधारा,शिवणी परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने शेतकरी वर्गात थोडेसे समाधानाचे वातावरण पहावयास मिळत आहे. यंदाही कोरोना महामारीमुळे उन्हाळयातील दोन महिने कडक लाँकडाऊन असल्याने शेतकयांनी यंदा उन्हाळा भर शेतातील नांगरणी,वखरणी,कचरा वेचणी हि कामे लवकरच पुर्ण करुन शेतकरी वर्ग पेरणीसाठी सज्ज झाला आहे. यातच रोहीणी नक्षत्रात व मूग नक्षत्राच्या तोडावर अधुम मधुन दोन तीन पाऊस झाल्याने शेतकयाची बि,बियाणे खरेदीसाठी व पेरणीसाठी लगबग सुरु झाली आहे.तर या पावसाने रानातील झाडी,झुडपेही हिरवीगार झाली असुन जनावरांनाही पाणी झाले आहे.

शिवणी : किनवट तालुक्यातील शिवणी परिसरामध्ये सकाळी ११ वाजे पासूनच जोरदार पावसाची सुरूवात झाली या भागातील नदी नाल्यात पाणी आले आहे.तर या पावसाने काही शेतक-्यांत समाधान तर काही शेतक-्यांचे कामे शिलक असल्याने शेतीचीकामे करण्यासाठी धावपळ होत असून काही शेतक-्यांची तारांबळ उडाली.तर बाजार पेठेत बियाणे व खतासाठी शेतक-यांची कृषी दुकानात गर्दी दिसून येत आहे.

किनवट तालुक्यातील शिवणी येथे गेल्या आठवड्या पासुन अधुन मधुन पाऊस चालु आहे व आज ११ वाजता वादळ वारा व विजाच्या कडकडा सह दमदार पाऊस झाला.असून आता शेतक-यां चे शेतीचे कामे अंतीम टप्यात आले आहेत.त्यातच आज दमदार पाऊस झाल्याने शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी दिसून येत आहे

शिवणी परिसरात आज दि ४ जुन रोजी ११ वाजता विजाच्या कडकडाट व वा-्यासह जोरदार पाऊस झाला या पावसाने शेतकरी समाधान झाला असून मृग नक्षत्र जवळ आल्याने शेतक-्यांचे शेतीचे कामे अंतीम टप्प्यात आले असून शेतकरी शेतीकामासाठी जोमाने कामाला लागला आहे. तर काही अनेक शेतकरी पेरणीसाठी बियाणे व खताच्या खरेदी करिता पैशाची जुळवा जुळवी करण्यासाठी धावपळ दिसून येत आहे तर कोरोना महामारी मुळे डबगाईला गेलेला शेतकरी खाजगी सावकार यांच्या दारी हजारी लावताना दिसून येत आहे. तर काही शेतकरी बँकेचे उंबरवठे झिझवित आहेत तर अनेक शेतकरी बियाणे खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रात गर्दी करताना दिसत आहेत.

खासगी रुग्णालयांना अवाजवी दर आकारता येणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या