26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडलोहा शहरात पावसाची जोरदार हजेरी

लोहा शहरात पावसाची जोरदार हजेरी

एकमत ऑनलाईन

लोहा : शहरासह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. बुधवारी झालेल्या या पावसाने खरीपाची पेरणी केलेल्या शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. मात्र शहरास या पावसाचा फटका बसला आहे. तुंबलेल्या नाल्यांची सफाई न झाल्याने नाल्यांचे घाण पाणी मोंढयात साचून शेजारच्या दुकानांत शिरले़ यात व्यापारी व शेतक-यांच्या मालाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर शहरातील काही सखल भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

यंदा पावसाने मृगनक्षत्राच्या मुहूर्तावर हजेरी लावली. यामुळे हुतांशी शेतकºयांनी पेरणीचे काम उरकून घेतले होते. पिकांना कोंब फुटल्यानंतर गेल्यया आठ ते दहा दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकरी संकटात आला होता. शिल्लक पिकांना पाणी आवश्यक होते त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. अखेर बुधवारी लोहा शहरासह पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला आहे. भीमा नंदीचेपात्रही वाहू लागले आहे.

परंतु शहरात या पावसाचा काहीसा फटका बसला आहे. पहिल्याच मोठ्या पावसाने अनेक भागातील नाल्या तुबल्या तर सखल भागात पाणी साचलेश होते. मागील काही दिवसापासून नगरपालिकेच्या वतीने शहरात साफ सफाई केली असल्याचे गाजावाजा करून सांगितले जात आहे.  मात्र पहिल्या पावसाने नगरपालिकाच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे.

मोंढा भागांमध्ये कसल्यात प्रकारची स्वच्छता मोहिम न राबविल्याने पावसाचे पाणी पूर्णपणे नाल्यांमध्ये साचले़ हेच पाणी मोंढा परिसरात साचुन दुकानात शिरले़ यात व्यापारी आणि शेतकरी यांच्या माल मोठ्या प्रमाणात भिजून नुकसान झाले़ यामुळे शहर स्वच्छ शहर सुंदर शहर करण्याची संकल्पना फोल ठरली आहे.

व्यापारी व नागरिकात संताप व्यक्त केला जात आहे. या घाण पाण्यामुळे या भागातील लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातील एवढी मोठी बाजारपेठेकडे न.प.चे दुर्लक्ष का असा प्रश्न व्यापारी वगार्तून विचारला जात आहे़ मुख्याधिकारी डॉ. किरण सूकलवाड यांनी त्वरीत याकडे लक्ष द्याचे अशी मागणी होत आहे.

Read More  प्रशासनासोबतच्या वादानंतर संत तुकाराम महाराजांच्या पादुका महाद्वार घाटावरुनच रवाना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या