28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडअहो, चव्हाण साहेब... जरा आमच्याकडेही लक्ष द्या हो..

अहो, चव्हाण साहेब… जरा आमच्याकडेही लक्ष द्या हो..

एकमत ऑनलाईन

अर्धापूर (रामराव भालेराव) : मागील एक वर्षभरापासून कोरोना आणि लॉकडाऊनमुळे हाताला काम नसलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांचे हाल होत आहेत. त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत असल्यामूळे तो त्रस्त झाला आहे. याकडे मायबाप सरकार दुर्लक्ष करित आहे. तेव्हा आपण आमचे पालक आहात म्हणून अहो, चव्हाण साहेब…. जरा आमच्या समस्याकडेही लक्ष द्या…! अशी आर्त आर्जव बांधकाम कामगारांकडून बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या विविध मागण्या त्वरित सोडविण्यात याव्यात. तसेच कोरोना काळात बेरोजगार झालेल्या कामगारांना शासनाकडून अर्थिक मदत द्यावी. अशी मागणी राज्याचे बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे अर्धापूर तालुक्यातील अनेक बांधकाम कामगारांनी निवेदनाद्वारे केली आहे.

आपल्या निवेदनात त्यांनी सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा शासनामार्फत विमा उतरवावा, त्यांना विशेष अर्थिक तरतूद करून घरकुलसाठी त्वरित निधी द्यावा, जिल्ह्यातील कोरोना बाधित होऊन मृत पावलेल्या कामगारांना त्वरित मृत्यू प्रमाणपत्र देण्यात यावे, नविन बांधकाम व्यवसाय उभारणीसाठी ५० टक्के अनुदान देवून त्वरित बॅक कर्ज मंजूर करण्यात यावेत. अशा विविध मागण्यासह बांधकाम कामगारांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणा-या पिंपरखेड ग्रामपंचायतीच्या संबंधित अधिकारी किंवा कर्मचारी यांच्यावर कडक कारवाई करून कामगारांना न्याय द्यावा.

अशा अनेक मागण्या बांधकाम कामगार संघटनेचे अधार्पूर तालुकाध्यक्ष कोंडीबा गोपाळजी लोणे यांच्या नेतृत्वाखाली मंत्री अशोकराव चव्हाण यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर कोंडीबा गोपाळजी लोणे यांच्यासह सुरेश लोणे, राहुल लोणे, अजय लोणे, गंगाधर वाहूळकर, दिपक लोणे यांच्या सह्या असून या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी नांदेड, तहसीलदार अधार्पूर यांनाही देण्यात आल्या आहेत.

राज्यावर अवकाळीचे संकट कायम

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या