26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडकामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे

कामावर पुन्हा घेण्यासाठी कामगारांचे धरणे

एकमत ऑनलाईन

भोकर : थकीत पगार त्वरित द्यावा व कामावर रुजू करावे या मागणी करीता सामाजिक वनीकरण व वनपरिक्षेत्र कार्यालयातील कामगारांनी दि.१७ मे पासून संबधित कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे. भोकर तालुक्यातील सामाजिक वनीकरण कार्यालयात बारमाही वनमजुर कामगार मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. परंतु मागील १० महिन्यापासून यातील १० कामगारांना कोणतीही पुर्व सुचना न देता काम करून घेऊन आता तुमचे ६० वर्ष पूर्ण झाले आहे, असे कारण पुढे करत पगार देता येणार नसल्याचे अचानक सांगण्यात आले असे आंदोलन कर्त्यांचे म्हणणे आहे.

या गैरप्रकरणी कामगारांनी वरीष्ठ अधिका-यांकडे दाद मागीतली असता कोणतीही ठोस कारवाई न करता संबंधित अधिका-याला पाठीशी घालत असल्याचा कामगारांनी अरोप केला आहे. तर वनपरिक्षेत्र किनी वन परिमंडल भोकर अंतर्गत कार्यरत ११ मजुरांना ६ महिन्याचा पगार न देता कामावरून कमी करण्यात आले व ६ महिन्याचा पगार देण्याचे लेखी अश्वासन देऊन मजुरांची दिशाभूल करत सह्या घेण्यात आल्या परंतु ठरल्याप्रमाणे पगार न देता कामावरून कमी करण्यात आल्यांचा आरोप कामगारांनी केलाआहे.

कोरोना काळात मजुरांची उपासमार होणार नाही यासाठी शासन विविध उपाययोजना राबवत आहे. परंतु याच काळात मनमानी कारभार करत काही अधिकारी मजुरांची उपेक्षा करत असल्याने या गैरप्रकरणी आम्हाला योग्य न्याय मिळावा या मागणी करता मजुरांनी आता धरणे आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन सुरू केले आहे. १० महिन्यापासून भोकर कार्यक्षत्रातील वनविभाग कार्यालयाने रोजंदारी कामगारांना कामावून कमी केल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांना त्वरीत कामावर रुजु करुन घ्यावे या प.्रमुख मागणीसाठी धरणे आंदोलनात बाबासाहेब कदम, गोविंद राठोड,विठ्ठल कदम, अमृता सोनटक्के, विठ्ठल डोंगरे,दुगार्बाई चव्हाण, आकाश जाधव, खंडु सुंकळेकर,सयाजी बाशनूरे, रामराव जाधव, दिगांबर बंबलवाड,संतोष राठोड, आनंदा घोडेकर, विठ्ठल पोलसवाड,लक्ष्मी येनगेवाड,निर्मलबाई घोगरे आदींनी आपला सहभाग नोंदवला आहे.

जिल्ह्यात गुंडांचा थरार; गोळीबारात एक ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या