31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home नांदेड कंधार येथे भाजपाच्यावतीने वीज बीलाची होळी

कंधार येथे भाजपाच्यावतीने वीज बीलाची होळी

एकमत ऑनलाईन

कंधार : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी, हात विक्रेते इत्यादींना लॉक डाउन कार्यकाळात काम धंदे बंद असल्याने उपजीविकेचा फटका बसला असे असताना सुद्धा राज्यातील आघाडी सरकारने विज बिल माफ करणार असल्याची घोषणा केली होती परंतु वीज बिल माफी करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले.

वीज बिल माफ न करता वीज दर वाढून नागरिकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे या विरोधात भाजपने वीज बिल माफ करावे या मागणीसाठी वीज बिलाची होळी केली. एप्रिल ते जून या तीन महिन्याचे एकत्रित बिल न पाठविता ते माफ करायला हवे तसे न करता बिल माफी करणार नसल्याचे जाहीर करण्यात आले असे शासनाने जाहीर केले आहे परंतु लॉक डाऊन काळात लोकांचा रोजगार पूर्णपणे बंद होता राज्यातील आघाडी सरकारचा निषेध करत महाराणा प्रताप चौक कंधार येथे लाईट बिल ची होळी करण्यात आली.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष भगवान राठोड, शहराध्यक्ष अँड गंगाप्रसाद यन्नावार, उपाध्यक्ष सुनील कांबळे, उपाध्यक्ष शंतनू कैलासे, सरचिटणीस मधुकर डांगे, उपाध्यक्ष महेश मोरे, सदाशिव नाईकवाडे, अँड सागर डोंगरजकर , बालाजी तोटावाड, तालुका चिटनीस विश्वंभर बसवंते, सचिन जैन, सौरभ बिडवई, भगवान राशिवंत सह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेवते रस्ता एक महिन्यापासून पाण्यात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या