22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १ हजार २५६ कोरोना बाधितांना सुट्टी ; केवळ ४२२ बाधित...

नांदेड जिल्ह्यात १ हजार २५६ कोरोना बाधितांना सुट्टी ; केवळ ४२२ बाधित वाढले

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांत घट होत आहे.बुधवारी प्राप्त झालेल्या २ हजार २६८ अहवालापैकी ४२२ अहवाल कोरोना बाधित आले आहेत.१ हजार २५६ कोरोना बाधितांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.मात्र तीन दिवसात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.नविन बाधितात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३१२ तर अँटिजेन तपासणीद्वारे ११० अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ८२ हजार २९८ एवढी झाली असून यातील ७३ हजार ५६५ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला ७ हजार ४१२ रुग्ण उपचार घेत असून २०३ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक ३ ते ५ मे या तीन दिवसांच्या कालावधीत १२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ६५१ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.७४ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा १०४, बिलोली १२, लोहा १२, नायगाव १८, बिदर १, नांदेड ग्रामीण १७, हदगाव २४, माहूर १, उमरी १८, वाशिम १, अधार्पूर १०, हिमायतनगर १९, मुदखेड ८, परभणी ८, यवतमाळ २, भोकर १३, कंधार १६, मुखेड १९, हिंगोली ८, झारखंड १ असे एकूण ३१२ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात १७, बिलोली ४, हिमायतनगर 6, माहूर 7, उमरी २ , नांदेड ग्रामीण ६, देगलूर ५, कंधार ४, मुखेड २, हिंगोली २, अधार्पूर ३, धमार्बाद २१, किनवट १०, नायगाव २, परभणी १, भोकर ४, हदगाव 4, लोहा ३, मुदखेड ७ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे ११० बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील १ हजार २५६ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १६, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ७५३, धमार्बाद तालुक्यातंर्गत २०, देगलूर कोविड रुग्णालय १२, अधार्पूर तालुक्यातंर्गत २०, उमरी तालुक्यातंर्गत ३५, माहूर तालुक्यातर्गंत ९, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २१, मुखेड कोविड रुग्णालय ३६, मुदखेड कोविड केअर सेंटर १५, किनवट कोविड रुग्णालय ३४, हिमायतनगर तालुक्यातर्गंत ३५, बिलोली तालुक्यातंर्गत ९, खाजगी रुग्णालय १६०, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १३, हदगाव कोविड रुगणालय ६, कंधार तालुक्यातर्गत २८, मांडवी कोविड केअर सेंटर ८, लोहा तालुक्यातर्गंत २५, बारड कोविड केअर सेटर १ असे एकूण १ हजार २५६ बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली .

आज ७ हजार ४१२ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १२५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ८३, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ( नवी इमारत) १५६, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ३३, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ६४, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ६९, देगलूर कोविड रुग्णालय १९, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर १३, बिलोली कोविड केअर सेंटर ८७, नायगाव कोविड केअर सेंटर ९, उमरी कोविड केअर सेंटर ३४, माहूर कोविड केअर सेंटर २९, भोकर कोविड केअर सेंटर ५, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३१, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ३५, कंधार कोविड केअर सेंटर १७, धमार्बाद कोविड केअर सेंटर ३७ , मुदखेड कोविड केअर सेंटर 8, हिमायतनगर कोविड केअर सेंटर ३, अधार्पूर कोविड केअर सेंटर १४, बारड कोविड केअर सेंटर २८, मांडवी कोविड केअर सेंटर ६, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय ७, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर ३३, एनआरआय कोविड केअर सेंटर ४६, पंजाब भवन कोविड केअर सेंटर १४ , नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण २ हजार ५४४, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण २ हजार २९८, खाजगी रुग्णालय १ हजार ५६५ असे एकूण ७ हजार ४१२ उपचार घेत आहेत.

बुधवारी सांयकाळी ५ वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे ४0, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे २0, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 58 भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर २५ खाटा उपलब्ध आहेत.

राज्याला अधिकार नसेल तर मराठा आरक्षण कायदा केंद्राकडे पाठवू – अशोक चव्हाण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या