23.1 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeनांदेडरेणुका गडासह रामगड किल्यावर होणार होमहवन विधी !

रेणुका गडासह रामगड किल्यावर होणार होमहवन विधी !

एकमत ऑनलाईन

माहूर/ हिमायतनगर : माहूर गड व हिमायतनगर येथील देवीच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले असून माहूर गडावर होमहवन विधी पारंपारिक पद्धतीने सपन्न झाला तर हिमायतनगरच्या कालिका मातेला नववी माळ अर्पण करण्यात आली. अष्टमी व नवमी एकत्र आल्याने रेणुका गडावर वैदिक मंत्रोच्चारात व षोडशोपचारात सहस्त्र नामावलीने कुंकुम अर्चन करून व पायसाचा नैवेद्य चढवून श्री रेणुका मातेची आरती करण्यात आली. आजच्या विधीचे पौरोहीत्य पुजारी भवानीदास भोपी व शुभम भोपी यांनी केले. अष्टमी व नवमी ह्या दोन्ही माळा एकत्र आल्याने अष्टमी संपताच आज दि.24 ऑक्टो.रोजी सायं.6 वा. मंदिरा समोरील पारंपरिक हवन कुंडात होम हवन विधी संपन्न होणार आहे.

श्री रेणुका मातेचा पूजा विधी पार पडल्या नंतर बोल भवानी की जयच्या जयघोषात वाजत-गाजत परिसर देवता पूजन करण्यात आले.यावेळी विश्वस्त चंद्रकांत भोपी,संजय काण्णव,विनायक फांदाडे,बालाजी जगत,आशीष जोशी,राजे दुगार्दास भोपी,आचार्य चंद्रकांत रिठे, रविंद्र काण्णव,विजय आमले, राजकुमार भोपी,पुजारी सुनील देव,आनंद देव,दिलीपराव पांडे यांचेसह अनेकांची उपस्थिती होती.

हिमायतनगर : शहरातील माता कालिंका मंदिरात नवमीनिमित्त भाविक सकाळपासूनच दर्शनासाठी मंदिर परिसरात दाखल झाले होते.दस-यासाठी मंदिर परिसरातील देवतांच्या मूर्तींना कलाकुसरीच्या वस्त्रांची सजावट सुद्धा करण्यात आली कोरोना महामारीमुळे सोशल डिस्टन्स ठेऊन बाहेरूनच अनेकांनी मातेचे दर्शन घेऊन आपल्या मनोकामना केली आहे

शहराची कुलस्वामिनी श्री कालिंका माता मंदिरात दर वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. दि.२४ रोजी सकाळी ११ अष्टमीची समाप्ती होणारं असल्याने सकाळी ९ वाजल्यापासून मंदिरात होम हवन करण्यात आले आहे. १२ वाजता नवमीला प्रारंभ होऊन नवमीनिमित्त अभिषेक सोहळा सुरु होता.

मोहोळ नगरपरिषदेत नव्या इमारतीच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या