31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home नांदेड पदवीधर मतदार यादीत प्रचंड गोंधळ

पदवीधर मतदार यादीत प्रचंड गोंधळ

एकमत ऑनलाईन

नांदेड : पदवीधर निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे त्यामुळे मतदारांची यादी उमेदवारांपर्यंत पोहंचली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या नावाची पोलचिट करुन मतदारांपर्यंत पोहंचविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या पोलचिटवर मतदाराचा पत्ता एकिकडे तर मतदान भलतीकडेच असल्यामुळे मतदार मतदान करण्यास इच्छूक नसल्याचे चित्र समोर येत आहे. एकिकडे निवडणूक प्रशासन निवडणुकीचे कामकाज पूर्ण झाल्याची वल्गना करत असतांना मतदार यादीत मात्र प्रचंड सावळा गोंधळ पहावयास मिळत आहे. यामुळे यावर्षीच्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदानावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून मतदानाची टक्केवारी देखील गतवेळेपेक्षा कमी होण्याची शक्यता असल्याचे भाकित राजकीय जाणकार सांगत आहेत.

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या १ डिसेंबरला होणार असून ही निवडणूक बहुरंगी निवडणूक होईल असे राजकीय विश्लेषक सांगत असले तरी आजघडीला महाआघाडीविरुद्ध भाजप अशी एकाकी लढत पहावयास मिळत आहे. महाआघाडी व भाजपने ही निवडणूक चांगलीच रंगात आणली आहे. नांदेड जिल्हयात भाजपपेक्षा महाआघाडी सरस दिसत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादीने शहरात व जिल्ह्यात डिजीटल बॅनरमध्ये बाजी मारल्यामुळे चर्चेला उधान आले आहे. २७ नोव्हेंबर रोजी महाआघाडीची सभा आयोजित करण्यात आली असून या सभेला महाआघाडीचे दिग्गजनेते हजेरी लावणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची बनली आहे.

पक्ष पातळीवर तयारी जोरात असली तरी निवडणूक प्रशासनाने मात्र उमेदवारांना चांगलेच गोचीत आणले आहे. अनेक मतदाराचे नाव वगळण्यात आले आहे तर काहींचे मतदारयादीत नाव आले पण मतदान भलत्याच ठिकाणी आल्यामुळे मतदारांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. काही मतदारांना पोलचिट मिळाली आहे पण त्यावर मतदान केंद्राचे नाव नाही. त्याठिकाणी मतदान केंद्र शून्य असे दर्शविण्यात आले आहे. त्यामुळे या मतदारांनी कोणत्या मतदान केंद्रावर जावून मतदान करावे असा प्रश्न समोर येत आहे. यासाठी उमेदवारांना मतदारांना मतदानाच्या ठिकाणापर्यंत ने-आण करण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. स्वयंस्फुर्तीने मतदान होणार नसल्याची शक्यता दिसून येत आहे. केवळ निवडणूक प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे उमेदवारांना झळ पोहंचणार आहे. यासंदर्भात उमेदवारांकडून ओरड झाली तरच योग्य व जवळ ठिकाणी मतदान करता येऊ शकते का यासाठी प्रयत्न केल्यास मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. परंतु वेळ कमी असल्यामुळे निवडणूक प्रशासन याकडे लक्ष देईल की नाही यासंदर्भात शासंकता व्यक्त होत आहे. एकंदरीत मतदाराला मात्र मतदान करायचे असेल तर आजघडीला दिलेल्या ठिकाणीच मतदान करण्याची वेळ आली
आहे.

हा तर राजकीय पक्षांचा गोंधळ असावा : जिल्हाधिकारी
सर्व राजकीय पक्षांना मतदारांची यादी नियमानुसार पाठवली आहे.परंतु राजकीय पक्षांनी त्यांच्या पोलचिटमध्ये नाव, मतदान केंद्र चुकीचे नोंदविले असल्यामुळे यदाकदाचित हा गोंधळ निर्माण झाला असावा. परंतु निवडणूक प्रशासनाकडून वेबसाईट तयार करण्यात आली असून त्यावर पूर्णत: योग्य नाव, मतदान केंद्र दर्शविण्यात आलेले आहे. त्यामुळे मतदारांनी ceo.maharashtra.gov.in/gtse या वेबसाईटवर जावून शोध घेतल्यास योग्य ते मार्गदर्शन मतदारांना मिळेल. त्यामुळे हा प्रशासनाचा गोंधळ नसून राजकीय पक्षांचा गोंधळ असावा अशी शक्यता जिल्हाधिका-यांनी वर्तविली आहे. याबाबत जास्तीचे भाष्य मला करण्याची इच्छा नसल्याचे नाही असे मत देखील त्यांनी व्यक्त केले.

शेतकरी कामगार पक्ष आतापर्यंत क्रांतिकारी विचाराच्या सोबत – माजी.आमदार गणपतरावजी देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या