25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeनांदेडकिनवटच्या विकासासाठी शासनाकडून भरीव निधी : आ. केराम

किनवटच्या विकासासाठी शासनाकडून भरीव निधी : आ. केराम

एकमत ऑनलाईन

किनवट : आदिवासीबहुल किनवट, माहूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासनाकडून मोठा निधी मिळाला असून, यासाठी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती आ. भीमराव केराम यांनी दिली.

विकास कामासाठी आलेल्या निधीतून राज्यजोड रस्ता तिर्थक्षेत्र विकास योजना विविध बौद्धविहाराचे सुशोभीकरण शासकीय आदिवासी आश्रम शाळेच्या विकासासाठी आणि मतदार संघाअंतर्गत रस्ते विकासासाठी निधी प्राप्त झाला आहे. अनेक कामांच्या निविदा निघाल्या तर काही कामांना प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. तर उर्वरित कामांनाही लवकरच प्रारंभ केला जाणार असल्याचेही आ. केराम म्हणाले.

किनवट, माहूर मतदार संघ विकासाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, कोविड कोरोना काळात विकास कामांना थोडा ब्रेक लागला होता. मात्र आता कोरोनाचे संकट दूर झाल्यानंतर शासनदरबारी विविध विकास कामासाठी कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त करून घेण्यात मला यश आल्याचे ते म्हणाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या