25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeनांदेडसोयाबीन कापसाचे प्रचंड नुकसान

सोयाबीन कापसाचे प्रचंड नुकसान

एकमत ऑनलाईन

हदगाव : हवामानाचा अंदाज खरा ठरल्यामुळे तालुक्यात सतत पाच दिवसापासून पावसाने थैमान घातले आहे.या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरीपणाने हिरावून घेतल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.गेल्याच महिन्यात ईसापूर धरणाच्या सांडव्याने पैनगंगा नदीला पूर आल्याने याचा मोठा फटका नदीकाठच्या शेतक-यांना बसला होता.

हदगाव तालुक्यातील हरडफ,वाटेगाव ,कोथळा,धोतरा – रावणगाव रुई – धानोरा या गावाच्या शिवारातील सोयाबीन व कापसाचे पीक उध्वस्त झाले होते.ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात पावसाने थोडीशी उघडझाप दिल्याने माथ्याच्या शिवारातील शेतक-यांनी सोयाबीन पिकांच्या कापणीला सुरवात केली होती तर दुस-्याच दिवशी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा पट्टा सरकत मराठवाड्यावर आल्याने हदगाव तालुक्यात गेल्या पाच दिवसापासून सतत अतिवृष्टी होत आहे. सोयाबीनच्या शेंगांना मोड फुटली आहेत काही शेतक-यांनी सोयाबीनचे ओले गंजी लावल्याने आतून सोयाबीन काळे पडले आहेत़ एक प्रकारे बळीराजावर निसर्ग कोपला असल्याने सध्या शेतकरी त्रस्त झाले आहेत. हातातोंडाशी आलेला सोयाबीन पिकाचा घास पावसाने हिरावून घेतल्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून मदत द्यावी अशी अपेक्षा शेतक-यांतून व्यक्त होत आहे.

गेल्या सप्टेंबर महिन्यात आठ ते दहा दिवस मुसळधार पाऊस पडला होता़ यामुळे हदगाव तालुक्यातील नदीनाल्यांना पुर आला होता़ यामुळे नदी काठच्या परिसरात असलेल्या शेकडो एकर जमीनीवरील पिकांचे नुकसान झाले होते़ तर अनेक गावांचा संपर्कही पुरामुळे तुटला होता़आता पुन्हा गेल्या चार ते पाच दिवसापासुन झालेल्या जोरदार पावसाने अतिवृष्टीची परिस्थीती निर्माण झाली असून शेतातील उभी पिके पाण्यात गेली आहेत़

अकलाई माता मंदिर परिसरात शिरले पावसाचे पाणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या