24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडदारू पिण्यास विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून

दारू पिण्यास विरोध केल्याने पतीने केला पत्नीचा खून

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : स्वत:च्या पत्नी दारू पिण्यास विरोध केल्यामुळे दारूड्या पतीने पत्नीचा खून केल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील बारसगाव शिवारात दि. २३ जून रोजी बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली. या प्रकरणी पतीविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अटक करण्यात आला आहे.

या बाबत अधिक माहिती अशी की, गत पाच वषार्पुर्वी चोरंबा येथील केदारनाथ तुकाराम बुलबुले याचा विवाह दांडेगाव येथील मारोती गिरे यांची मुलगी वेदिका यांच्याशी झाला. त्यांना तीन वर्षाची आरती नावाची एक मुलगी आहे. मारोती काशीराम गिरे हे कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव येथील असून सध्या ते बारसगाव शिवारात गोविंद पवार यांच्या शेतामध्ये सालगडी म्हणून काम करतात. तर त्यांचा जावई केदारनाथ बुलबुले हे बारसगाव शिवारात अश्विन पवार यांच्या शेतात सालगडी म्हणून काम करतात. दोघेही बारसगाव शिवारात सालगडी म्हणून काम करत होते. दि.२२ जून रोजी रात्री सासरे यांच्या येथे जेवनाचा कार्यक्रम होता. यावेळी केदारनाथ बुलबुले व त्यांची पत्नी वेदिका येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर केदारनाथ ने त्याची पत्नी व सासरा यांच्यासोबत वादावादी करून पत्नीला जबरदस्तीने आखाड्यावरून त्यांच्या घरी घेऊन गेला. तिथे गेल्यानंतर मला दारू पिण्यास विरोध का केला म्हणून पत्नीसोबत वाद केला. यात त्याने आपल्या पत्नीला दगडाने ठेचून जिवंत मारले.

ही घटना बारसगाव शिवारात बुधवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली असून सकाळी हा सर्व प्रकार उघडकीस आला. मयत वेदिका बुलबुले हिच्या डोक्याला व तोंडावर दगडाने जबर मारहाण केल्याने जखमी झालेल्या वेदिकाचा मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी पती केदारनाथ बुलबुलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फॉरेन्सिक लॅबच्या तज्ज्ञ टीमने केली तपासणी या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक लँबची तज्ज्ञ टीम घटनास्थळी पोहोचली. आणि या प्रकरणाची सखोल तपासणी केली.

तर अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. टि. नांदगावकर, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे, के. के. मांगुळकर, विद्यासागर वैध, गुरुदास आरेवार, संदिप आनेबोईनवाड, जमादार बालाजी तोरणे, ईश्वर लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. या घटनेतील नराधम पतीच्या क्रूर कृत्याबद्दल सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे.

महागाईचे आव्हान पेलताना…

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या