26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeनांदेडशेतकऱ्यांना मदत नाही होत तर सरकारने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू...

शेतकऱ्यांना मदत नाही होत तर सरकारने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी – डॉ. धर्मराज चव्हाण

एकमत ऑनलाईन

कंधार (सय्यद हबीब) : परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे प्रशासन आणि राजकीय व्यवस्था बांधावर न जाता पंचनामे सुरू आहेत या कुंभकर्णी झोपेतून प्रशासनाला जागे करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने समिती गठित करून शेतकऱ्यांची परिस्थिती थेट बांधावर जाऊन पाहणी करुन वंचित बहुजन आघाडी शेतक-यांच्या दुःखात सहभागी होत सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा या अनुषंगाने दौरे चालू असून तालुक्यातील लाठ खुर्द, आलेगाव, दाताळा या ठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांना मदत नाही होत तर सरकारने राजीनामा द्यावा आणि राष्ट्रपती राजवट लागू करावी असे कंधार येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन विभागीय प्रवक्ता डॉ. धर्मराज चव्हाण यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेला दक्षिण जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले उत्तर जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले जिल्हाध्यक्ष दैवशाला ताई पांचाळ सचिव श्याम कांबळे महानगराध्यक्ष विठ्ठल गायकवाड आदींच्या उपस्थितीत पुढे बोलताना चव्हाण म्हणाले, राज्यात करोनाचे संकट त्यामुळे शेतकरी आधीच हवालदिल झालेले असताना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी अधिक अडचणीत सापडला आहे. अतिवृष्टीमुळे हाती आलेले पिक वाया गेले. मूग, उडीद पाण्याखाली गेले. त्याला कोंब फुटले. सोयाबीनसह अन्य पिकांची यापेक्षा वेगळी स्थिती नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांना मदत नाही होत तर सरकारने राजीनामा द्यावा असे यावेळी बोलताना सांगितले हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून घेतला त्यामुळे कर्जबाजारी असलेल्या शेतकरी हताश झाला आहे.

कर्जबाजारीपणा व बँकेची उदासीनता आणि प्रशासनिक नाकर्तेपणामुळे शेतकर्‍यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यातही अस्मानी संकट या सर्व परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. अजून पर्यंत पंचनामे सुरू झाले नाही तथाकथित नेते व मुख्यमंत्री फक्त बोल बच्चन करण्यात व शिवार पर्यटनात मग्न आहेत कालपर्यंत शेतकरी पिक विमा कंपनीचे कार्यालय फोडा म्हणणारे आज सत्तेत आहेत मग आता का शेतकर्‍याने त्यांच्या गाड्या फोडायचा का असा प्रतिप्रश्न करत या अस्मानी संकटात शेतकऱ्यांना मदत करणे हे शासनाचे धोरण असायला हवे पण तसे होताना दिसून येत नाही मदतीसाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे बोट दाखवते व केंद्र सरकार राज्य सरकारकडे काहीही झाले तरी तुमचा आमचा पोशिंदा जगला पाहिजे कर्ज काढा, केंद्राला विनंती करुन पिक विमा कंपनीचे नियम शिथिल करायला सांगा या सर्व गोष्टी करण्यास राज्य सरकार असमर्थ ठरत असल्याचे सांगितले यावेळी बेंद्रिकर, दिलीप दादा जोंधळे, संतोष पाटील गवारे, प्रेमानंद गायकवाड, मोसिम बागवान, भास्कर कदम, सुमेध पवार, विश्वंभर डुबुकवाड, संग्राम नरंगले, बबन जोंधळे आदींची उपस्थिती होती.

डिकसळच्या त्या रस्त्याकडे तहसिलदारांचे साफ दुर्लक्ष

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या