28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeनांदेडतिकिट न दिल्यास भाजपकडे जाणार

तिकिट न दिल्यास भाजपकडे जाणार

एकमत ऑनलाईन

नांदेड : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवामुळे तणावात असलेल्या महाविकास आघाडीपुढे देगलूरमधील शिवसेनेच्या माजी आमदाराने टेन्शन वाढवले आहे. माजी आमदार सुभाष साबणे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी न मिळाल्यास भाजपमध्ये जाणार असल्याचा इशारा दिला आहे. आता महाविकास आघाडीचे नेते काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून तिन्ही पक्षांतील असंतुष्टांना सामावून घेणे ही महाआघाडीसाठी डोकेदुखी बनली आहे. पंढरपूरच्या निवडणुकीतही शिवसेनेच्या पदाधिकारी शैला गोडसे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसल्याने पराभव झाल्याचे दिसून आले होते. अशातच आता नांदेडमधील देगलूरमध्येही तोच प्रकार होण्याची चिन्हे आहेत. देगलूर विधानसभेचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर लवकरच पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यासाठी महाआघाडीमध्ये राजकीय खलबते सुरू असतानाच साबणे यांनी पक्षांतराचा इशारा देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांची चिंता वाढवली आहे.

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांच्या मुलाला निवडणुकीची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. तर, दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पोटनिवडणुकीचे तिकिट आपल्यालाच मिळावे, असा आग्रह त्यांनी धरला आहे. साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते असून ते याआधी दोन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत.

अर्धापूर तालुक्यात अवकाळी पावसाने केली दाणादाण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या