उस्माननगर : गोदावरी नदीवरील पात्रात कामळज , कौडगाव , येळी येथील घाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. हा वाळू उपसा तात्काळ बंद करुन पर्यावरणाचे संरक्षण करण्याची मागणी मारतळा येथील पत्रकार संघाने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मारतळा परिसरातील गोदावरी नदीवरील कामळज , कौडगाव , येळी येथील घाटावर मागील दोन महिन्यापासून दिवस-रात्र ताफ्याच्या साह्याने परराज्यातील मजूर लावून मोठ्या प्रमाणात अवैध वाळुचा उपसा सुरू असून ,यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असुन मानवी जिवनासाठी अंत्यत मोठा धोका निर्माण होत असुन वाळु उत्खननामुळे नदीचे पात्र मोठे होऊन शेतीचे देखील नुकसान होत आहे यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती निर्माण होत आहेत पाणी पातळी देखील कमी होत असल्याने हा उपसा नुकसानकारक ठरत आहे यामुळे होत असलेल्या अवैध रेती उपसा सुरु असताना देखील लोहा महसूल व कंधार उपविभागीय कार्यालयाचे तसेच गौण खनिज विभागाचे देखील याकडे दुर्लक्ष होत आहे.
यासंदर्भात वारंवार तहसीलदार यांच्या कडे तक्रारी करूनही दखल घेत जात नसल्याने . अवैध वाळुचा चोरून उपसा होत आहे यामुळे शासनाचा लाखोंचा महसूल देखील बुडत आहे .वरील तिन्ही घाटावरील होणारा अवैध वाळू उपसा येणा-्या दोन दिवसात बंद करण्यात यावा तसेच येळी येथील घाटावरील अवैध पध्दतीने उपसा करुन २५०० ब्रास रेतीचा साठा मोजुन ठेवला असताना रेती माफियांनी हा साठा चोरून नेला असल्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसुल बुडाला आहे त्यामुळे या प्रकरणाची देखील चौकशी करून संबधिताकडुन महसूल वसूल करण्यात यावा व दोषी अधिका-यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावेत. अन्यथा अमरण उपोषण सुरू करण्यात येईल .असा इशारा जिल्हाधिकारी याच्याकडे दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे या निवेदनावर गणेश ढेपे , संजय देशमुख , बालासाहेब शिंदे , नागेश वडवळे , संजय ढेपे , उत्तम हंबर्डे आदीच्या स्वाक्षरी केल्या आहेत.
पद्मभूषण डॉ. अशोक कुकडे यांचा लातूर कपडा बँकेतर्फे गौरव