30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeनांदेडबियर शॉपीवर चालतोय अवैध दारु पुरवठा..!

बियर शॉपीवर चालतोय अवैध दारु पुरवठा..!

एकमत ऑनलाईन

वाई बाजार (प्रशांत शिंदे) : नांदेड जिल्हाअधिकारी डॉ.विपीन इटणकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ब्रेक दि चेन नियमावली लागू केली असली तरी माहुर तालुक्यातील वाई बाजार ग्राम पंचायत प्रशासनाने नेहमी प्रमाणे झोपेच सोंग घेतल्याने दि.८ व ९ एप्रील रोजी अत्यावश्यक दुकानासह अनेक दुकाने उघडल्याने ब्रेक दी चेन नियमावलीचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे दिसून आले.जिल्हातील कोरोणा रोगाची दिवसेन दिवस वाढ होत असुन त्याचा शिरकाव माहुर तालुक्यात सुद्धा फार झपाट्याने वाढत असतांना ही स्थानिक प्रशासनाच्या आर्शिवादाने येथील बियर शॉपीवर चालतो देशी व विदेशी दारु विक्रीचा व्यवसाय.

वाई बाजार येथिल बियर शॉपीवर नियमाची पायमल्ली करुन अवैध रीत्या दारु विक्री केली जात असल्याचे ग्रामस्थाकडुन बोलल्या जात आहे.फक्त बियर शॉपीचाच परवाना असतांना सुद्धा येथे देशी दारु, विदेशी दारुसह इतर सर्व प्रकारची दारु अवैध रीत्या चड्या दराने विक्री होत असून या अवैध विक्री व्यवसायाला अभय कुणाचे असा सवाल नागरिकांना पडला आहे. येथील शाळकरी विध्यार्थी,नवतरुण मंडळी हे व्यसनात अमाप पैसा खर्च करत असून गावाबाहेरच्या बियर शॉपीवर मौज मजा मारत असल्याचे दिसुन येत आहे. सज्जनाचे जगने हराम होवून दुर्जनांची दिवाळी होत आहे.याकडे एल.सी.बी,दारु बंदी इन्स्पेक्टर तसेच पोलिस यञंनेने सुध्दा लक्ष देवून दखल घेणे गरजेचे असल्याचे जाणकार नागरिकांकडून बोलल्या जात आहे.

येथील तळीराम दिवसा ढवळ्या मद्य प्राशन करुण सार्वजनिक ठिकाणी नियमाचे उल्लघण करत असल्याचे चिञ पहावयास मिळत आहे.कोरोणा रोगाच्या नियमाची अमलबजावणी करण्यासाठी पोलिस प्रशासन जन जागृती करत असले तरी स्थानिक प्रशासन माञ अर्थीक संबधामुळे मुग गिळून बसल्याने पाहिजे तसा प्रतिसाद नागरिक देत नसल्याने त्याचाच फायदा अवैध व्यवसायीक घेत आहे.तरी सिंदखेड पोलिस ठाण्याचे कर्तव्य दक्ष ठाणेदार भालचंद्र तिडके यांनी जनजागृतीसह अवैध कारभारावर वेळीच आवर घालुन योग्य ति कार्यवाही करावी अशी मागनी कोरोना रोगाणे भयभीत असलेल्या नागरीकातुन जोर धरु लागली आहे.

हिंगोली जिल्ह्यात वैद्यकीय सेवा, किराणा वगळता बाजारपेठ बंद !

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या